विधानसभा निवडणुकांच्या आधी पंजाब सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर

चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 10 दिवसांत होणार असल्याचे … Read more

अफगाणिस्तानात तालिबानकडून कर्जमाफी; महिलांना केलं महत्त्वपूर्ण आवाहन

काबुल – अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने देशभर कर्जमाफी जाहीर करून टाकली आहे. तसेच देशभरातील महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन देखील केले आहे. तालिबान्यांची होती भारतीय दूतावासावर नजर; भारतीय हवाईदलाने केलं ‘थरारक’ रेस्क्यू ऑपरेशन देशभरात निर्माण झालेला तणाव शांत करण्याचा हा प्रयत्न आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असलेल्या इनामुल्लाह समानगनी याने ही माहिती दिली. देशातील प्रांतीय … Read more

2,426 कंपन्यांनी थकविले 1.47 लाख कोटींचे कर्ज

नवी दिल्ली – ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने 17 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे 1.47 लाख कोटी रुपयाचे कर्ज 2,426 कंपन्यानी थकीत ठेवले असल्याची माहिती जारी केली. या कर्ज थकविलेल्या लोकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. त्यांना कसल्याही सवलती दिल्या जाऊ नयेत, असे या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे. या संघटनेचे सरचिटणीस सी … Read more

वीजबिलासह पूर्ण कर्जमाफीची मागणी

अकोले  (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचे वीज बिल, उर्वरीत बॅंक कर्ज रक्कम शंभर टक्के माफ व्हावे, शेतकऱ्यांना बांधावर खते – औषधे, बी- बियाणे मिळावे, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावरच कांदा खरेदी व्हावी, अशा आशयाचे निवेदन अकोले नगरपंचायतच्या नगरसेवक सुभद्राताई संपतराव नाईकवाडी व स्वातीताई संदीप शेणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. करोना विषाणुने थैमान घातलेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळेनासा झाला आहे. शेती पिकविण्यासाठी पाहिजे, त्या प्रमाणात शेतीची औषधे, खते न मिळाल्यामुळे देखील शेतकरी राजा देशोधडीला लागला आहे.त्यामुळे लॉकडाऊन पाहता शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी शेती पिकवण्यासाठी घेतलेले सरकारी बॅंकांचे कर्ज व वीजबिल हे शंभर टक्के माफ केले जावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असा आग्रह धरून नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी 30 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची सरकारने तरतूद केलेली आहे. या शिवाय नाबार्ड 90 हजार कोटी रुपये देत आहेत. म्हणजेच 120 हजार कोटी रुपये शासन व नाबार्ड मिळून 3 कोटी छोट्या व शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याचा मानस आहे. परंतु ते कर्ज वितरण न करता शेतकऱ्यांच्या नावावर असलेले कर्ज व वीज बिल जर माफ केले तर खऱ्या अर्थाने शेतकरी बळीराजाला येथून पुढील वाटचाल व जीवन जगण्याचा मार्ग सोईस्कर होईल. या सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये 450 ते 600 रुपये क्विंटल या प्रमाणे मातीमोल भावाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात आहे. त्या ऐवजी शासनाने किमान 1400 ते 1500 या बाजार भावाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा व नुकसान झाल्यास शासनाने ती सोसावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, असे धोरण स्वीकारले पाहिजे असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. या निवेदन प्रती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसूलमंत्री, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना दिल्या आहेत.

कर्जमाफीसाठी राज्यातील 63 बॅंकांची निवड

पुणे – राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज खात्यांची माहिती भरण्यासाठी राज्यातील 63 बॅंकांची निवड केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि सहकारी मिळून 30 आणि खासगी 33 बॅंका आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत माहिती भरल्यानंतर अर्जाची छाननी होऊन मार्चपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा … Read more

शेतकऱ्यांना भरपाईचे दावे पोकळ?

अनेकजण अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत : कागदांवर मात्र मदत पूर्ण पुणे – जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यात हवेली, वेल्हा, पुरंदर आणि बारामतीवगळात सर्व तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के वाटप केल्याचा अहवाल देखील दिला. परंतु, अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील शेत … Read more

‘फेब्रुवारीअखेर बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा होईल’

कृषिमंत्री दादा भुसे यांची ग्वाही पुणे – महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार फेब्रुवारीअखेर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. पुणे दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या … Read more

फसव्या कर्जमाफीविरोधात हजारो शेतकऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटलांचा धडक मोर्चा

कोल्हापूर – राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज … Read more

कर्जमाफी योजना प्रशिक्षणावर करणार पावणेदोन कोटींचा खर्च

राज्यातील 34 जिल्ह्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधी पुणे – राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमुक्‍ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी एक कोटी 70 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता 34 जिल्ह्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधी … Read more

कर्जमाफी जाहीर झाली, आता पीककर्ज वसुली थांबवण्याची मागणी

पुणे -शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरू न झाल्याने खासगी बॅंका व पतसंस्थांकडून कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची वसुली रोखण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नवीन विहीर खोदाई, विद्युत मोटार, शेततळे, पाइपलाइन अशा विविध कारणांसाठी शेतकऱ्यांनी खासगी बॅंका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान … Read more