पुणे जिल्हा : हरिनाम सप्ताहात भीमाशेत येथे दीपोत्सव

तळेगाव ढमढेरे : येथील भीमाशेत येथे संत शिरोमणी सावता महाराज व श्री हनुमान मंदिराच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवात मेणबत्तीनी केलेली प्रकाश भाविकांच्या नजरा खिळून ठेवल्या होत्या. कलश पूजन व वीणापूजनाने अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला. अखंड … Read more

पुणेकरांनो, जगातील सर्वात मोठ्या दीपोत्सवात सहभागी व्हा.! चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

पुणे : “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (दि. २२) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे,” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. … Read more

अहमदनगर – “माऊली माऊली “चा जयघोष करत नेवासे येथे दीपोत्सव साजरा

आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ नेवासा – संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळयाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली … Read more

PUNE: दिव्यांच्या रोषणाईत उजळली हुजूरपागा शाळा

पुणे : हुजूरपागा संस्थेच्या कात्रज येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पुणे – महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा, कात्रज येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र विद्यार्थिनींनी केलेली दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांचे गालिचे, वार्‍यावर झुलणारे आकाशकंदील, फुलांची तोरणे यांनी शाळेचा परिसर सजला होता. कट आऊटची, ठिपक्यांची रांगोळी तसेच वडील व मुलगी या … Read more

लक्ष लक्ष मशालींच्या प्रकाशाने उजळली रायगडची राजसदर

सातारा  -संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीसाठी जोरदार तयारी सुरू असताना शिवराज्याभिषेक दिन सेवासमिती मुंबई व येसुबाई फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिवाळीच्या तोंडावर रायगडावरील राजसदरेसमोर मशाल रॅली काढण्यात आली. पारंपारिक वेषातील मावळे हातात मशाली आणि मनामध्ये दाटलेली शिवभक्ती अशा जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवभक्तांनी राजसदर मशालींच्या प्रकाशाने उजळवून टाकली. शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे कार्यवाहक … Read more

सातारा  – दिवाळीच्या हंगामातही झेंडूला मिळेना भाव

सातारा  – ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला दरवाजे स्वागत कमानीची शोभा वाढविणाऱ्या हारातील झेंडू पुलाला भाव मिळेनासा झाला आहे . 40 ते 50 रू किलोने बाजारात विक्री होत असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. साताऱ्याच्या बाजारात अवकाळी पाऊस तसेच सातत्याने उघडीप घेणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या उष्ण व आर्द्र या विचित्र हवामानामुळे झेंडूची पिक वाचवताना कराड, सातारा, वाई … Read more

सातारा  – प्रकाशमयी दीपोत्सवाला आजपासून सुरुवात

सातारा  – प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीला उद्या, दि. 12 पासून सुरुवात होत आहे. अज्ञानाचा अंध:कार दूर करून, ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या या उत्सवासाठी सातारकर सज्ज झाले आहेत. अनेक मंदिरांमध्ये आणि इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घरोघरी लावण्यात आलेल्या आकाश कंदिलांनी शहर उजळून गले आहे. अंधारावर प्रकाशाच्या, वाईटावर चांगल्याच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे … Read more

लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त सायंकाळी सहापासून

पुणे – उद्या सोमवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. सायंकाळी 6.8 मिनिटे ते 8.38 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. घरोघरी या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते.  

दीपोत्सव : पणतीचे तेज

दीपावलीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी पणती तेवत आहे. पणतीची मंद स्वयंप्रकाशित ज्योत घरोघरी अंधाराला छेदून जग प्रकाशित करीत आहे. तिच्या उजळणाऱ्या आणि उजळविणाऱ्या ज्योतीला सहस्र दंडवत. कारण स्वयंप्रकाशाने तळपणाऱ्या आणि जगाला उजळविणाऱ्या त्या इवल्याशा ज्योतीला दंडवत. ही ज्योत तेवत आहे ती जगाला उजळविण्यासाठी. जेथे आहे तेथे प्रकाश देणे हे पणतीचे काम. माणसाला मात्र जग उजळविण्यासाठी प्रथम … Read more

अयोध्येत दिवाळीला होणार झगमगाट

नवी दिल्ली – तब्बल 492 वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात पहिल्यांदा भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आगामी दीपावलीनिमित्त प्रभु श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत तब्बल 5 लाख 50 हजार लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी फक्त मर्यादित परिसरात दिवाळी साजरी केली जात असे. शिवाय फक्त मंदिरातील पुजाऱ्यांना दिवे लावण्याची परवानगी होती. यंदाच्या वर्षी देशात कोरोना व्हायरसंचं सावट … Read more