WPL 2024 : दीप्ती शर्माने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू….

Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या एका रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावाने पराभव केला. दीप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले, जिने 59 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 138 पर्यंत नेली. यानंतर त्याने 4 विकेट्सही घेतल्या, ज्या दरम्यान तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात … Read more

ICC Player of the Month Award : भारतीय महिला संघाची दीप्ती ठरली सर्वोत्तम खेळाडू…

ICC Women’s Player of the Month for December : – भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्मा हिला गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. Deepti Sharma became the second India player to win the ICC Women’s Player of the Month … Read more

INDW vs ENGW Test Day 2 : दीप्ती शर्माचा पंच, इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांवर आटोपला…

India Women vs England Women Test Match Day 2 : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. भारताचा पहिला डाव आज 428 धावांवर संपला. टीम इंडियाने शुक्रवारच्या स्कोअरमध्ये आणखी 18 धावांची भर घातली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपल्यानं भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. … Read more

#ENGvIND : दिप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले मंकडिंग; समर्थन करत अश्विन म्हणाला “मी का ट्रेंड …”

लंडन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने इंग्लंडला त्यांच्याच जमिनीवर एकदिवसीय मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप देण्यात यश मिळवले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना बऱ्याच कारणांनी चर्चेत राहीला. कारण याच सामन्यात भारतीय आनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्ण विराम दिला. त्याचबरोबर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर इंग्लंडची शार्लोट डीन मंकडिंग … Read more

भारतीय स्टार खेळाडूंविना होणार दुबईतील महिला क्रिकेट लीग; बीसीसीआयने ‘या’ कारणामुळे नाकारली परवानगी

मुंबई  – दुबईत एक अनोख्या प्रकारातील महिलांची क्रिकेट लीग होणार आहे. येत्या 1 मे पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून जगभरातील महिला क्रिकेटपटू यात सहभागी होत असून याच कालावधीत महिलांची वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्यामुळे भारताच्या महिला क्रिकेटपटूंना या लीगमध्ये सहभागी होण्यास बीसीसीआयने परवानगी नाकारली आहे. या वेगळ्या रचनेच्या लीगमध्ये तब्बल 35 देशांतील महिला क्रिकेटपटू … Read more

भारताच्या महिला क्रिकेटपटूंची द हंड्रेड लीगमध्ये धमाल

लंडन – भारताच्या तीन महिला क्रिकेटपटूंनी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. जेमिमा रॉड्रीग्ज, शेफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांनी आपल्या कामगिरीने आपापल्या संघांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. दीप्तीने लंडन स्पिरीट संघाकडून खेळताना मॅंचेस्टर ऑरिजिनल्सविरुद्ध विजयी खेळी केली.मॅंचेस्टर ऑरिजनल्सने प्रथम फलंदाजी करत 100 चेंडूंत 5 बाद 127 धावा केल्या. … Read more

अर्जुन पुरस्कार : बुमराहसह ‘या’ दोन महिला क्रिकेटपटूंच्या नावाचीही शिफारस

मुंबई – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. देशपातळीवरील हा एक अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. गेल्या वेळी अव्वल क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाचे नाव मंडळाने पुढे केले होते. तेव्हा देखील बुमराहचे नाव मागे पडले होते. प्रत्येक क्रीडा संघटना व संस्थेला दोन नावांची … Read more

आजच्याच दिवशी ‘या’ दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंनी रचली होती विश्वविक्रमी भागीदारी

पुणे – क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये कोणता विक्रम केव्हा बनेल किंवा तो कसा व कोणी तोडेल हे सांगणे फार कठीण आहे. असाच एक विक्रम आजच्यादिवशी म्हणजे १५ मे २०१७ साली दिप्ती शर्मा आणि पुनम राऊत या जोडीने आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रमी भागीदारी रचली होती. सेनवेस पार्कमध्ये झालेल्या चौरंगी वनडे मालिकेतील आयर्लंडविरूध्दच्या सामन्यात … Read more