पिंपरी | अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीची बदनामी

पिंपरी, (प्रतिनिधी) – तरुणीचे नग्न व्हिडिओ आणि फोटो तसेच मेसेज व्हाटसअपवरून पाठवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या बहिणीला देखील अश्लील व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली. हा प्रकार १७ मे रोजी मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडला. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने शनिवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा … Read more

शशी थरूर यांना बजावली नोटीस; बदनामी केल्याचा चंद्रशेखर यांचा आरोप

थिरूवनंतपूरम  – केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना कायदेशीर नोटीस बजावली. थरूर यांनी बदनामी केल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे. केरळमधील थिरूवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून थरूर आणि चंद्रशेखर एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यातून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अशात थरूर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत … Read more

…तर सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार – मंत्री दादा भुसे

मुंबई – ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे  यांनी केला. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचेही दादा भुसे म्हणाले. ड्रग्ज माफिया ललित पाटील यांना ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री … Read more

उद्धव ठाकरे, संजय राऊत हाजीर हो; शिवडी कोर्टाकडून ‘त्या’ प्रकरणी दोघांनाही समन्स; १४ जुलैला उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई: मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांनाही समन्स बजावले आहे. या दोघांनाही न्यायालयाने १४ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांची सामनाच्या अग्रलेखातून बदनामी करण्यात आली, खोटी बातमी करण्यात आली. त्यानंतर राहुल शेवाळेंनी मानहानीचा अर्ज दाखल केला होता. प्रकरणी न्यायालयाकडून … Read more

Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

पुणे – पुणे महानगरपालिकेतील सभागृहनेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात काल गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात असल्यामुळे कोणीतरी माझी बदनामी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी तक्रारअर्जात नमूद केले आहे. … Read more

Rahul Gandhi Defamation: राहुल गांधींवरील कारवाईचे पडसाद उमटले अमेरिकेच्या संसदेत; खासदारांनी मोदींना म्हटले,”…

नवी दिल्ली : देशात काल एक मोठी घडामोड घडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावरील या कारवाईचे पडसाद संपूर्ण देशात तर उमटले पण जागतिक स्तरावरून  देखील याविषयी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधीवरील कारवाईचे पडसाद चक्क अमेरिकेच्या संसदेत उमटल्याचे माहिती समोर येत आहे. मूळ … Read more

Defamation : राहुल गांधीनंतर आता पंतप्रधान मोदींवर मानहानीचा खटला? ; काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्याचे ट्विट व्हायरल

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, त्यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला खरा पण आता यावरून राजकीय वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली आहे. आता काँग्रेसच्या माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी पंतप्रधानांवर मानहानीचा खटला दाखल करण्याची भाषा केली आहे. काँग्रेस नेता आणि माजी मंत्री रेणुका चौधरी … Read more

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; श्रीकांत शिंदेची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपावर आता प्रतिक्रिया उमटत असून राऊत यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर … Read more

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर नाना पटोले म्हणाले,”भाजपच पक्षाला बदनाम करतंय…”

मुंबई : नाशिकच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकत सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि भाजपच्या पाठिंब्यावर ती जिंकली सुद्धा. मात्र या निवडणुकीने पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. त्याच वादावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसवर सत्यजित … Read more

“हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल…”; धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार संतप्त

मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. यानंतर भाजपासहीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. तसेच वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त … Read more