नगर जिल्ह्यात सहा कृषी केंद्रांचा परवाना निलंबित

नगर – कापूस बियाणे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगाम सन 2023-24साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व … Read more

उडीद उत्पादनात कर्जतचा शेतकरी प्रथम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

कर्जत – कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत कर्जत तालुक्‍यातील निमगाव गागंर्डा येथील शेतकरी दिपक तुकाराम ढगे यांनी सन 2022-23 मध्ये खरीप हंगामात झालेल्या पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात उडीद पिकाच्या उत्पादनात ते राज्यात प्रथम आले आहेत. कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत ढगे यांच्या उडीद पिकाची उत्पादकता ही 33 क्विंटल हेक्‍टर … Read more

कर्जतमध्ये भाडेतत्त्वावर औजार बॅंक

कर्जत – कृषी विभागाकडून ट्रॅक्‍टर व इतर औजारे यांना अनुदान दिले जाते. मात्र, ट्रॅक्‍टर व औजाराच्या किंमती देखील वाढलेल्या आहेत, मात्र आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पद्धतीने ट्रॅक्‍टर व औजारे खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. हीच अडचण ध्यानात घेऊन कृषी विभागाने भाडेतत्त्वावर औजार बॅंक ही योजना आणली आहे. शुक्रवारी तालुक्‍यातील 27 औजार बॅंकधारकांची … Read more

“समाजकल्याण’च्या लाभार्थींची निवडही लॉटरी पध्दतीने

सातारा –  कृषी विभागाप्रमाणे समाजकल्याण विभागांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थींची निवडही आता लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत याला मान्यता देण्यात आली आहे. या सभेत विषय पत्रिकेवरील व ऐनवेळचे असे अकरा विषय मंजूर करण्यात आले असून एक विषय स्थगित ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या … Read more

कृषि विभागाच्या लक्ष्मी योजनेत घरातील महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा – कृषिमंत्री भुसे

नाशिक : महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात … Read more

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभाग

पुणे – कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडामध्ये  दिनांक 2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये  तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग , पुणे यांनी वर्तवली आहे. सोयाबीन, … Read more

शेतकऱ्यांना फळ पीक विमा मिळण्यासाठी कृषी विभागाने समन्वय करावा

अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळ पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. मात्र विमा कंपन्यांच्या निकषामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अडचणी येतात. प्रामुख्याने हवामानावर आधारित फळ पीक‍ विम्याचा लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाने विमा कंपन्यांशी समन्वय करावा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात पूनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी … Read more

एकाच अर्जावर मिळणार कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ

मुंबई : शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामापासून ‘महाडीबीटी पोर्टल’वर हि प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी एकाच अर्ज द्यावा लागणार आहे. शेतकऱ्याच्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागात जाण्याची गरज पडणार नाही अशी माहिती कृषीमंत्री … Read more