नगर – 603 गावांत लंपीचा प्रादुर्भाव

नगर – जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्‍यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 603 गावात 855 बाधीत जनावरांची संख्या आहे. तर 292 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागीलवर्षी हाच आकडा 50 हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्‍यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत. जिल्ह्यात 13 लाख जनावरांची संख्या असून 72 हजार 685 गोवर्गीय जनावरांची संख्या आहे. … Read more

Lumpy skin disease : राज्यात 6 हजार 791 पशुधन उपचाराने झाले बरे

मुंबई : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्पी चर्म रोग आटोक्यात येत असून एकूण 6 हजार 791 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात  23 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील एकूण 1 हजार 666 … Read more

राज्यात आणखी एका आजाराची चाहूल; चार जनावरांचा मृत्यू

पिरंगुट – येथे घटसर्पसदृश्‍य आजाराने चार जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन म्हशी, एक रेडा व पारडीचा समावेश असून उर्वरित चार जनावरे वाचविण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. मंगळवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी व निदानासाठी प्रयोगशाळेत पाठविलेले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर या रोगाचे निदान होणार आहे.

सावधान…बर्ड फ्लूची पुण्याच्या सीमेवर धडक

पुणे – जिल्ह्यातील दौंडपाठोपाठ पुणे शहराच्या सीमेवरील मुळशी तालुक्यातील प्रकल्पातील तब्बल 5,139 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या पोल्ट्री परिसरातील एक किलोमीटरचे क्षेत्र बाधित तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पुढील 21 दिवस प्रतिबंध आदेश लागू करण्यात आला असून, कुकुट पक्ष्यांची … Read more

पुण्यातही “बर्ड फ्लू’चा शिरकाव?

  पुणे – राज्यात “बर्ड फ्लू’ने शिरकाव केलेला असतानाच आता पुण्यातही “बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याची शक्‍यता आहे. बुधवारी कॅम्प परिसरात दोन कावळे मृतावस्थेत सापडले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर काही नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कॅन्टोन्मेंट बोर्डासही संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. या उलट तुम्ही महापालिकेस ही बाब कळवा, … Read more