नगर | आदिवासी बांधवांनी योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी

राहाता, (प्रतिनिधी) – प्रत्येक आदिवासी बांधवांनी आपल्या घरापासूनच व्यसन, अंधश्रद्धा याला फाटा देत शिक्षणाच्या माध्यमातून व आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधली पाहिजे, असे आवाहन आदिवासी नेते शिवाजीराव गांगुर्डे यांनी केले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी एल्गार महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी केवळ 1 कोटी

  पुणे – आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शासनाकडून केवळ 1 कोटी रुपयांचाच निधी उपलब्ध झाला आहे. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याने काटकसरीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. वित्त विभागाने 33 टक्‍के मर्यादेत खर्चासाठी नियोजनात्मक सूचना दिल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्थसंकल्पात 4 कोटी रुपयांची … Read more

आदिवासी प्रशिक्षण संस्थेला 50 लाखांचा निधी

  पुणे – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला 50 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने मान्यता दिली. 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य या योजनेंतर्गत केंद्र शासनाने एकूण 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधींच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान केली आहे. त्यापैकी 3 कोटी 88 लाख रुपयांचा निधी आदिवासी संशोधन व … Read more

निवासी आश्रमशाळांसाठी “अनलॉक लर्निंग’

पुणे – करोना पार्श्‍वभूमीवर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामधील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी 28 कोटी 59 लाख रुपये खर्च येणार आहे. निवासी आश्रमशाळांमध्ये पहिल्या सत्रात अनौपचारिक शिक्षण सुरू ठेवणे आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नियोजन आराखडा तयार करून शिक्षणाच्या मूलभूत … Read more