कोथरूडच्या घटनेनंतर आता वनविभाग “अलर्ट’

पुणे  – कोथरूडमधील गवा बचाव मोहिमेच्या घटनेनंतर वनविभागाने आपल्याकडील सर्वच वनपरिक्षेत्राकडील संसाधनांबाबत सखोल आढावा घेण्यात आला आहे. यात आता काही संसाधनांची खरेदी प्रक्रिया  “तातडीच्या’ स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जाळी, ट्रान्क्विलीझर, पिंजरे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सुरक्षा जॅकेट यांसारख्या सुरक्षा संसाधनांचाही समावेश असणार आहे.     पुणे शहर परिसरात मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळतात. यामध्ये … Read more

कोविड कालावधीत शिक्षण विभागाचे काम उत्तम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात अनेक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत. … Read more

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडला ‘नेपच्युन’

पुणे(प्रतिनिधी) – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोक्कातील फरार आरोपीस जेरबंद केले आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल होते. तो एका गुन्हयात मार्च महिन्या पासून फरार होता. नेपच्युन उर्फ नेपश्‍या पिजारो काळे (34 रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.13/3/2020 रोजी रात्री 1.20 … Read more

…तर संपूर्ण आरोग्य विभागच “क्‍वारंटाइन’

पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मागील तीन दिवसांत महापौरांनी आरोग्य तसेच इतर काही विभागांच्या बैठका महापौर बंगल्यावर घेतल्या आहेत. या शिवाय, डॉक्‍टर डेनिमित्त त्यांनी दोन ठिकाणी कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता महापौरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. शहरात करोनाचा पहिला … Read more

‘त्या’ विभागाच्या रुग्णालयांतील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्राची मंजुरी

मुंबई :  मुंबईमध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाशी संबंधित रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मान्यता दिली  आहे. शेवटचा पर्याय म्हणून त्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, … Read more

विजय वडेटटीवार यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याचा कार्यभार

मुंबई : मनासारखे खाते न मिळाल्याने रूसून बसलेले कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन हे खाते देखील सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी या खातेबदलास मान्यता दिली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. विजय वडेटटीवार यांना भूकंप पूनर्वसन … Read more

मनपाच्या उद्यान विभागाचे पाच कर्मचारी निलंबित

नगर – महापालिकेतील उद्यान विभागातील कर्मचारी कामात टाळाटाळ करतात. कामावर गैरहजर असणे, ठरावीक ठिकाणीच बदलीची मागणी करतात, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी (दि.16) रात्री उद्यान विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस व दोन महिला कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. द्विवेदी … Read more