रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई :- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. खासगी बसची गुणवत्ता व नियमावलीची अंमलबजावणी, महामार्गावरील सुरक्षा तसेच अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी गुरूवारी(दि.६) संबंधितांना निर्देशित केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय … Read more

उपसभापती नीलम गोऱ्हेंचा जखमी वारकऱ्यांना दिलासा; विचारपूस करत केली आर्थिक मदत

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवारी (दि. 5 जुलै) वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली. अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात … Read more

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपातांच्या घटनांबाबत कडक कारवाई करा – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपाताच्या घटना घडत असल्याने या घटनेतील सर्व संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच या प्रकरणी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून या घटनेचा सखोल तपास करावा, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे दिले आहेत. बक्करवाडी (ता. गेवराई जि.बीड) येथे आणखी एका महिलेचे अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस … Read more

खुलताबाद तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या – उपसभापती नीलम गोऱ्हे

औरंगाबाद : कृषि, आरोग्य, रोजगार हमी अशा विविध विभागांच्या योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. याशिवाय कोविड काळात विधवा झालेल्या एकल महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देऊन, बालकांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा. अशा प्रकारे शासनाच्या विविध योजनेच्या लाभातून सर्वांगीण विकास साध्य करावा अशा सूचना खुलताबाद तालुका प्रशासनास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे … Read more

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

पुणे : राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून विविध योजना आणि कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसह कृषी उत्पादन वाढविण्यासाठी पशुसवंर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आयोजित पशुसंवर्धन … Read more

समाजकारण आणि राजकारण एकमेकांस पूरक – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई : राजकारण आणि समाजकारण एकमेकांस पूरक विषय आहेत. एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी देशातील विविध भागातील इंडियन स्कूल आँफ डेमोक्राँसी या संस्थेत शिकणारे विद्यार्थी उपस्थित … Read more

‘एमटीपी’च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय मंडळांची नियुक्ती करावी – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई : केंद्र सरकारने एमटीपी कायद्यात दुरूस्ती करुन गर्भधारणा समाप्तीच्या परवानगीचा कालावधी वाढविला आहे. त्या कालावधीनंतर गर्भधारणेची समाप्ती करावयाची असेल तर त्यासाठी जिल्हास्तरीय मंडळांची परवानगी आवश्यक केली आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय मंडळ तत्काळ नियुक्त करावेत अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एमटीपी … Read more