पिंपरी | देऊळगावराजे आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजनाच्या 36 शस्त्रक्रिया

देऊळगावराजे, (वार्ताहर)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण योजनेचे एकूण 36 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अविनाश अलमवार यांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी फलटण येथीलसर्जन कदम याना बोलावण्यात आले होते. तसेच त्याच्या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अविनाश आल्लमवार आणि स्नेहा शिंदगणे, कोमल गावडे, अजयकुमार पोतन, मयूर वाहुळे, तनुजा कुर्‍हाडे, सुप्रिया तलवारे, … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात साथीचे आजार बळावले; प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘ओपीडी’साठी गर्दी

देऊळगावराजे – देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सामान्य गोरगरीब नागरिकांसाठी ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया सर्दी, खोकला आदी रुग्णांवर मोफत, चांगल्या प्रकारचे उपचार होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर मातांवरही मोठ्या प्रमाणात औषध उपचार होत आहेत. मागील महिन्यामध्ये 15 प्रसूती झाली आहे. शनिवारी रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अविनाश … Read more

‘दौंड शुगर’कडून पेमेंटही जमा

खासगी आणि सहकारी कारखान्यांत उसासाठी स्पर्धा सुरू देऊळगावराजे – जिल्ह्यात सर्वात प्रथम दौंड शुगर कारखान्याने 2019 या चालु वर्षाचा 2700 रुपये ऊसदर जाहीर कारून खासगी कारखान्यांची ऊसदराची कोंडी फोडली आहे. चालू हंगामातील दि. 22 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबर या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट बॅंकेत दि. 9 डिसेंबर रोजी जमा करण्यात आल्याने उसाच्या तुटवड्यात … Read more

दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात एसटी बेभरवशाची

दौंड-सिद्धटेक रस्त्यावर विद्यार्थ्यांचे हाल देऊळगावराजे – दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात एसटी महामंडळच्या गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. दौंड तालुक्‍यातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव, सिद्धटेक, हिंगणीबेर्डी येथील विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी दौंड येथे येत असतात; पण मध्यंतरी शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुटी असल्यामुळे काही दिवस विद्यार्थी घरी होते. त्यामुळे चालू असलेली शटल गाडी … Read more

शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

देऊळगावराजे येथील घटना देऊळगावराजे – येथील एका खासगी शेततळ्यामध्ये बाप लेकाच्या शेतमजुरांच्या पाण्यात बुडवून मुत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोहन जाधव (वय 50), किरण जाधव (दोघे रा. निंबूत, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, देऊळगावराजे (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप ननावरे यांच्या शेतात हे … Read more

दौंड-सिद्धटेक रस्त्यावर साईडपट्ट्यांही खोदल्या

१८ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटाफुटांवर खड्डे देऊळगाव राजे – दौंड-सिद्धटेक रस्त्यावर परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सिद्धटेक हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण असून, या अठरा किलोमीटरच्या प्रवासासाठी नागरिकांना आणि गणेशभक्तांना एक तास लागत आहे. त्यातच या रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या सहा महिन्यांपूर्वी खोदल्या असून त्या अद्याप भरल्या नसल्याने अरुंद व खड्डेमय रस्त्याने नागरिकांना … Read more