कराड तालुक्‍यातील 54 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

कराड – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कराड तालुक्‍यातील विकासकामांना मोठया प्रमाणावर मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कराड तालुक्‍यातील सुमारे 54 कोटी 78 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, याबद्दल ना. फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र … Read more

आर्थिक हितसंबंधांमुळे राष्ट्रवादी आमदारांचे इशारे : मंत्री विखे

नगर – वाळू व गौण खनिजाअभावी जिल्ह्यात कुठेही विकासकामे ठप्प नाहीत. त्यामुळे या मुद्‌द्‌यावर आंदोलनाचे जे इशारे दिले जात आहेत. त्यांचेच बेकायदा उत्खनन व माफियांबरोबर असणारे आर्थिक हितसंबंध आता उघड होत आहेत. आता त्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद होत आहेत. म्हणून ते आता आंदोलनाचे इशारे देत आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

गाव बाळासाहेब थोरातांचे, मतदारसंघ मात्र मंत्री विखेंचा

अमोल मतकर संगमनेर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता थोरात यांच्या मूळगावी आणि विखे यांच्या मतदारसंघातील जोर्वे गावातील ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, ऐन थंडीत गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संगमनेर तालुक्‍यात एकूण 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, संपूर्ण तालुक्‍यासह जिल्ह्याचं लक्ष जोर्वे … Read more

सामाजिक न्याय खात्याच्या विकासकामांना स्थागिती देणे हा संविधानविरोधी निर्णय – सचिन खरात

मुंबई – सामाजिक न्याय खात्याच्या विकासकामांना स्थागिती देणे हा संविधानविरोधी निर्णय, तात्काळ याचा फेरविचार करून या कामाची स्थगिती उठवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सचिन खरात यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य सरकारने सामाजिक खात्याच्या 600 कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती दिली … Read more

“मंत्रीपद गेल्याचे नाहीतर विकासकामे ठप्प झाल्याचे दुःख”; माजी मंत्री शंकरराव गडाख यांची खंत

 सोनईतकार्यकर्त्यांचा ‘संवाद’ मेळावा संपन्न नेवासा   – राज्याच्या सत्तांतरच्या राजकीय दुर्घटनेमुळे मंत्रीपद गेल्याचे अजिबात दुःख नाही, मात्र दुःख आहे ते मंजूर केलेली कोट्यवधींची विकासकामे ठप्प झाल्याचे. मंत्री झाल्यावर दोन वर्षे कोरोनात महामारीत गेले. मात्र त्यानंतर मिळालेल्या काळात तालुक्यासाठी विकासकामांसाठी कोट्यवधींचा योजना व निधी मिळाळविला. आणखी अडीच वर्षे मिळाली असतेतर तालुक्यातील सर्व विकासकामे मार्गी लावता आली असती … Read more

सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

पुणे (प्रतिनिधी) : शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून विकासकामे करता येणार आहेत. त्यानुसार एका सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त 50 लाखापर्यंतची विकासकामे करता येणार असून त्यामध्ये रस्ते, पेव्हिंग ब्लॉक़, सीसीटिव्ही कॅमेरे अशा कामांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी सोसायट्यांमध्ये विकासकामे करण्यास परवानगी मिळावी यासाठी गेली वर्षभर सातत्याने … Read more

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :- देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. शुक्रवारी(दि.17) पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबू सिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, एड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी … Read more

पिंपरी: विकासकामे करताना संकटांचा विचार का नाही?

अनेक ठिकाणी अग्निशामकच्या बंबांना मारावा लागतोय वळसा पिंपरी – शहरातील विकासकामे करताना अग्निशामक दलाचा विचार केला जात नाही. यामुळे हीच विकासकामे अग्निशामक दलासाठी अडथळा ठरत आहे. चुकीच्या विकास कामांमुळे घटनास्थळी लवकर पोहचता येत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्‍यात येत आहे. यामुळे यापुढील विकासकामे करताना अग्निशामक दलाचाही विचार होणे गरजेचे आहे. शहरातून जाणारा मुंबई पुणे हा 12 … Read more

पुणे : विकासकामांची उद्‌घाटने आणि भूमिपुजनांची मारा कुदळ

बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) – महापालिका निवडणुकीची तयारी प्रभाग क्र. 1 ते 58 मध्ये सुरू झाली आहे. यात विद्यमान नगरसेवकांनी आपल्या जुन्या-नव्या प्रभागात विकासकामांची उद्‌घाटने आणि योजनांच्या भूमिपूजनाची कुदळ मारण्यास सुरूवात केली आहे. काही प्रबळ इच्छुक उमेदवारांकडूनही आरक्षणाचा अंदाज बांधत स्वखर्चातून कामांचे नारळ फोडले जात आहेत. यातून महापालिका निवडणूक जवळ आल्याची जाणीव आता नागरिकांनाही झाली आहे. … Read more

हसत-खेळत,”मंजूर…मंजूर…मंजूर’

पुणे – गेल्या काही महिन्यांपासून आरोप- प्रत्यारोप आणि गैरव्यवहारांच्या फैरी झाडणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी शुक्रवारी अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 1,200 कोटींच्या विकासकामांना कोणत्याही चर्चेविना हसत-खेळत मान्यता दिली. या ऑनलाइन सभेत प्रस्तावांना मान्यता देताना अनेक नगरसेवकांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे माइकच बंद ठेवत त्यांचाही आवाज दाबत चर्चाच होऊ देण्यात आली नाही. निवडणुका जवळ येत … Read more