पुणे जिल्हा | खेडचा राजकीय संन्यास केव्हा मिटणार?

शेलपिंपळगाव,  (वार्ताहर) – काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला खेड तालुका राज्यातील मंत्रीपद, खासदार अशा विविध पदांपासून मात्र दूरच असल्याचे चित्र आजपर्यंत पाहायला मिळत आहे. स्व. आमदार नारायणराव पवार यांनी सलग 20 वर्षे या विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले त्यानंतर त्यांचा पराभव करत दिलीप मोहिते यांना 15 वर्षे विधानसभेवर खेड तालुक्यातील जनतेने पाठवले स्व. नारायण पवार यांच्या आधीही … Read more

पुणे जिल्हा : दिलीप मोहिते रोखठोक नेतृत्व

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथ मंत्री जयंत पाटील यांचे गौरवोद्‌गार राजगुरूनगर येथे कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव राजगुरूनगर – लोकांना रोखठोक वाटणारे नेतृत्व म्हणजे दिलीप मोहिते पाटील आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

“भाजपमध्ये जाण्यासाठीच आढळराव घेतायत शिवसेनाविरोधी भूमिका”

राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्‍याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही खेड तालुक्‍याला काय योगदान दिले ? विमानतळ, ‘सेझ’ला विरोध करून खेड तालुका मागे ठेवण्याचं काम केलं. आता खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून दादागिरी करीत आहेत. तुमची दादागिरी कदापि खपवून घेणार नाही असा इशारा खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना … Read more

थोड्याच दिवसांत “त्यांच्या’ कामांचा पर्दाफाश होणार

खेड तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यात दिलीप मोहिते यांचा घणाघात सांगुर्डी – विद्यमान आमदारांनी निवडणुकांपूर्वी कामे मंजूर झाल्याचे खोटे सांगून भूमिपूजने केली आहेत. थोड्याच दिवसांत त्यांच्या कामांचा पर्दाफाश होईल, असा घणाघात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 14) कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, वाघजाईनगर, राणूबाईमळा, महात्माफुले नगर, शिक्षक … Read more

दिलीप मोहिते यांच्या घर टू घरला उदंड प्रतिसाद

राजगुरूनगरात नागरिकांकडून जोरदार स्वागत राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या “घर टू घर’ दौऱ्याला उदंड प्रतिसाद लाभला असून या दौऱ्यात महाआघाडीचे तालुक्‍यातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तालुक्‍यातील गावागावांतील दौरा झाल्यानंतर आता “घर टू … Read more

उत्तरार्ध असल्याने शेवट गोड व्हावा

दिलीप मोहिते पाटील : खेड-आळंदीसाठी राष्ट्रवादीकडून भरला उमेदवारी अर्ज राजगुरूनगर – माझी ही शेवटची निवडणूक आहे. उत्तरार्ध आहे, म्हणून शेवट गोड व्हावा ही भावना आहे, असे भावनिक आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. त्यापूर्वी खेड बाजार समितीच्या … Read more

‘मी मुख्यमंत्री’ हे सांगण्यासाठीच…

राजगुरूनगर – भाजपची महाधनादेशावर महाजनादेश यात्रा व शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा ही नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निघालेली नाही, तर “मुख्यमंत्री मीच होणार’ हे सांगण्यासाठी निघालेली आहे. शिवसेनेच्या युवराजांची जनआशीर्वाद यात्रा निघाली आहे; पण या वयात ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायाचे असतात, असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी देत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर बोचरी टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवसुराज्य … Read more

मोहितेंवरील कारवाई हा राजकीय सूड

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांचा प्रतिहल्ला : खेड तालुक्‍यात 125 निषेध सभा चाकण – मराठा आंदोलनाप्रकरणी चाकण पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर 120 (ब) कलम वाढविण्याचा व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर होणारी कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचे मत पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात … Read more

मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

माजी आमदार मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचा निषेध : कारवाईमागे सूडभावनेचा आरोप शिंदे वासुली – चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा संघाच्या वतीने 30 जुलै 2018 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात सुमारे कितीतरी कोटी रुपये शासन व वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. यावेळी झालेल्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते … Read more

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा?

चाकणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा निषेध : गुन्हा रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चाकण – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, याची कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. 11) चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निषेध नोंदविला. तसेच खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार … Read more