खुशखबर…! कॅशलेस उपचारांना एका तासाच्या आत परवानगी मिळणार तर डिस्चार्ज झाल्यानंतर 3 तासांच्या आत क्लेम सेटलमेंट होणार..

Health Insurance । आता आरोग्य विम्यामध्ये कॅशलेस उपचारांसाठी एका तासाच्या आत परवानगी द्यावी लागेल, डिस्चार्ज झाल्यानंतर 3 तासांच्या आत क्लेम सेटलमेंट आवश्यक आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (IRDAI) बुधवारी आरोग्य विम्याबद्दल एक मास्टर परिपत्रक जारी केले. या परिपत्रकामध्ये विमा कंपनीला विनंती केल्यानंतर एका तासाच्या आत कॅशलेस उपचारांना परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे … Read more

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; पार पडली शस्त्रक्रिया, वाचा हेल्थ अपडेट

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा त्याचे चाहते सतत सैफ अली खानच्या तब्येतीचे अपडेट्स विचारत होते. काल अचानक रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सगळेच काळजीत पडले होते. मात्र, त्याला शस्त्रक्रियेसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो घरी परतला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ … Read more

पुणे जिल्हा : उजनीत येणारा विसर्ग घटला

जलाशयात 29 हजार क्‍युसेकने पाणी : वाटचाल 50 टक्‍क्‍यांकडे टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसात झालेल्या पावसामुळे मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांतून आलेल्या पाण्यामुळे उजनीच्या वरील 19 पैकी 16 धरणे शंभर टक्के भरली. खाली दौंडकडे भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत गेला व एक ऑक्‍टोबर पर्यंत उजनी जलाशयात 38 टक्के पाणीसाठा … Read more

पुणे जिल्हा : उजनी धरणातून विसर्ग सुरु

वर्षभराचे नियोजन कोलमडणार : केवळ 24 टक्‍के पाणीसाठा पळसदेव/ वडापुरी – पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातील जलसाठा संथ गतीने वाढत सध्या धरणात केवळ 24 टक्‍के पाणीसाठा आहे. आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व औस बंधारा भरण्यासाठी उजनीतून सुमारे 5 टीएमसी पाणी नदीव्दारे सोडण्यात येणार आहे. धरणातील उपयुक्‍त पाणीसाठ्यापैकी … Read more

धनंजय मुंडेंना मिळाला डिस्चार्ज; कुटुंबियांकडून कार्यकर्त्यांना आवाहन म्हणाले,’ त्यांना विश्रांतीची गरज’

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस धनंजय मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. तसेच माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची … Read more

पुणे जिल्हा : वीर धरणातून सहा हजार क्‍युसेक विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा परिंचे – नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर (ता. पुरंदर) धरणातून शुक्रवारी दुपारी दोन वाजता नीरा नदी पात्रात 4 हजार 418 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. धरणातील सांडव्याचा एक दरवाजा चार फुटांनी उचलून नदीपात्रात 4418 क्‍युसेक … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज!

uddhav thackeray

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे फिजिओथेरपी उपचार सुरु होते. दरम्यान आज तब्बल 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. Mumbai | Maharashtra CM Uddhav Thackeray has been … Read more

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर असून त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तापाची लक्षणे आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंह यांना या वर्षीच्या सुरूवातील करोना विषाणूची लागण झाली होती. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी … Read more

कोयना धरणाच्या विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठी सावधानतेचा इशारा

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात होणारी पाण्याची आवक नियंत्रणात ठेवण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता धरणाच्या विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सावधानतेचा इशारा दिला … Read more

पुणेकरांना दिलासा! शहरात 4 हजार 825 बाधितांना डिस्चार्ज; नवीन 2,025 पॉझिटिव्ह

पुणे – करोना बाधितांची संख्या कमी झाली असून, त्याच्या दुप्पट बरे झालेल्यांची संख्या असल्याचे दिवसभरातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिवसभरात 2 हजार 025 बाधितांची नोंद झाली, तर 4 हजार 825 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. बाधितांची संख्या आता कमी होण्याला आणि पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याला सुरुवात झाली आहे. ही आनंदाचा गोष्ट असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मात्र … Read more