पाकिस्तानातील इंटरनेट सेवा विस्कळीत

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा शनिवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे सोशल मीडियावरून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. इंटरनेट सेवा सरकारकडून जाणीवपूर्वक विस्कळीत करण्यात आल्याचा आरोप पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी केला. देशातील इंटरनेट जाणीवपूर्वक खंडीत करण्यात आले आहे. हा सरकारचा … Read more

बंदमुळे मणिपूरचे जनजीवन विस्कळीत

इम्फाळ – मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात एका २३ वर्षीय ग्रामस्थ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर त्या भागातील नागरीकांच्या समितीने ४८ तासांचा बंद पुकारल्यामुळे शनिवारी मणिपुरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. नागरी समाज संघटनांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या संयुक्त कृती समितीने पहाटे ५ वाजल्यापासून हा बंद पुकारला होता. १७ जानेवारी रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या गोळीबारात गावातील स्वयंसेवक ठार झाला, … Read more

पुणे जिल्हा : “जिओ जीने नही देता…” मोबाइल नेटवर्क विस्कळीत

न्हावरे – माळवाडी, तांदळी (ता. शिरूर) येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांदळी परिसरातील माळवाडी या भागांत जिओ कंपनीची सेवा विस्कळीत झाल्याने फोन लागत नाही. तसेच फोन आल्यानंतर किंवा केल्यानंतर आवाज अस्पष्ट येणे, फोन अचानक कट होणे, इंटरनेटला रेंज असूनही … Read more

पुणे : पावसाच्या अंदाजाकडे दुर्लक्ष भोवले ; पालिकेला मिळाला होता आधीच अंदाज

कर्वेनगर, सिंहगड रस्ता भागात पूरस्थिती : पालकमंत्र्यांच्या फोननंतर आयुक्‍त घटनास्थळी पुणे – शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने कर्वेनगर, कात्रज, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, सहकारनगर परिसरांत पावसाचे पाणी शिरले. शिवाय, विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक वळवण्यात आलेल्या रस्त्यांवर तळी साचल्याने कोंडी झाली. तर, दुसऱ्या बाजूला या पूरस्थितीचे खापर पालिकेने पावसावर फोडले आहे. पण कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता परिसरांत … Read more

हजारो प्रवासी वेगवेगळ्या विमानतळांवर राहिले ताटकळत ! ‘या’ कारणामुळे ब्रिटनची विमानसेवा विस्कळीत

नवी दिल्ली – तांत्रिक कारणामुळे आज ब्रिटनमधील विमानसेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना वेगवेगळ्या विमानतळांवर ताटकळत राहिले होते. ब्रिटनमध्ये येणारी आणि ब्रिटनमधून अन्य देशांमध्ये जाणारी सर्व विमाने विमानतळांवरच थांबून राहिली होती. तातडीच्या कामांसाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्तापसहन करावा लागला. ब्रिटनच्या विमान वाहतुक व्यवस्थेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानतळावरून कोणत्याही विमानांना उड्डाण करण्याचे … Read more

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत

मालगाडीचे इंजिन बंद; काही काळ वाहतूक ठप्प पुणे – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील शेलारवाडीजवळ एका मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे बुधवारी सकाळी पुणे-मुंबईदरम्यान होणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक काही काळ ठप्प होती. अनेक गाड्यांना मुंबईला पोहोचायला उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळी 9.18 मिनिटांनी शेलारवाडी येथे एका मालगाडीचे इंजिन (लोको) अचानक बंद पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला पुणे-मुंबई दरम्यान होणारी … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

लोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रविवारी (दि.23)रात्री आडोशी गावचे हद्दीत दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरडीचा रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला केल्यावर साधारण 4.30 तासाच्या खोळंब्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. रायगड जिल्ह्यातील आडोशी गावचे हद्दीत किमी 41 जवळ मुंबई लाईनवर रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दगड व माती एक्सप्रेस हायवेच्या मुंबई बाजूच्या … Read more

पुण्यात ई-डेपोला ‘पीएमआरडीए’चा खो

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -भोसरी व मोशी येथे पीएमपीने ई-डेपो उभारण्याचे नियोजन केले खरे; पण भाडेतत्त्वारील या जागा ऐन वेळी जागेची मालकी असलेल्या “पीएमआरडीए’ने काढून घेतल्याने ई-डेपोचे नियोजन बारगळले आहे. त्यामुळे डेपोसाठी पीएमपीला आता पुन्हा जागेच्या पाहणीपासून सुरुवात करावी लागणार आहे. पीएमपीने ई-डेपोचे नियोजन केलेल्या तीन जागांपैकी वरील दोन जागा पुणे महानगर विकास … Read more

पुण्यात जड वाहनांमुळे नियोजन विस्कळीत ! म्हात्रे पूल ते नळ स्टॉप मार्गाचीही कोंडी

  सहकारनगर, दि. 20 – म्हात्रे पूल ते नळ स्टॉप चौक मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन आणि पर्यायाने पैशांचा अपव्यय होत आहे. शिवाय, मनस्ताप होत आहे, तो वेगळाच. या परिस्थितीला जडवाहने कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या मार्गावर काही हॉस्पिटल्स आहेत. पण, अनेकदा रुग्णवाहिकेलाही कोंडीचा सामना करावा … Read more

पुणे जिल्हा : स्वारगेट-नीरा शटलसेवा विस्कळीत

* प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका * “पीएमपीएमएल’ बससेवा बंद होण्याच्या हालचालींना वेग * शटल बससेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी वाल्हे- हडपसर-नीरा मार्गावर ‘पीएमपीएल’ बससेवा 21 जानेवारी मोठा गाजावाजा करीत श्रेयवादासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीत वाल्हे, नीरा येथे पीएमपीएल बसचे जोरदार स्वागतात सुरू झाली होती. एका महिन्यात स्वारगेट- सासवड- नीरा शटलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे … Read more