स्कूल बॅग, गणवेष विकायला खाजगी शाळांना बंदी ! ‘या’ राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षण विभागाला आदेश

Ban schools to sell school bags, uniforms : राज्यातील सर्व खासगी शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, गणवेष आणि अन्य कोणत्याही वस्तू शाळेतूनच घेण्याची सक्ती करता कामा नये. शाळांनी फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करावे, दुकानदारी करु नये, असे स्पष्ट आदेश भोपाळचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी जारी केले आहेत. मध्य प्रदेश राजपत्रातील असाधारण २ डिसेंबर २०२० मध्ये … Read more

सातारा : दुष्काळावरील उपाययोजनांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

सातारा – पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान असल्याने 11 नोव्हे. 2023 च्या शासन निर्णयानुसार, 75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाच्या मंडलांमध्ये सातारा जिल्ह्यातील 65 मंडलांचा समावेश आहे. त्यात आणखी 12 मंडलांच्या समावेशाचा प्रस्ताव तयार केला आहे. या मंडलांमध्ये दुष्काळ घोषित झाल्यावरर त्या अनुषंगाने सवलती, कर्जवसुलीस स्थगिती, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फीमाफी, रोजगार कामांमध्ये शिथिलता, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणे या सवलतींचे … Read more

तहसीलदार कंत्राटीबाबत सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे – भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा निर्णय घेताना रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्या उमेदवारांचा तरी विचार करायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार … Read more

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

पुणे – तलाठी यांच्या बदलीचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्‍यांमध्येच तलाठ्यांची पूर्ण सेवा होत होती. आता शासनाने यामध्ये बदल करून हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तलाठी यांच्या बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्‍यात होणार आहे. 2013 पासून उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांची पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा … Read more

पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात 63 ब्लॅक स्पॉट; अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात सतत अपघात होणाऱ्या ठिकाणे ब्लॅक स्पॉट 63 आहेत. या ब्लॅक स्पॉटवर अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्‍लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्‍चित कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त … Read more

Ratnagiri : चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा; उपमुख्यमंत्र्याकङून जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना

मुंबई :- कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने … Read more

बोगस आदिवासी आमदार, खासदारांना हटवा; ऑफ्रोह संघटना, महिला आघाडीची साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पाचगणी – अनुसूचित जमातीवर होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑफ्रोह संघटनेची सातारा शाखा आणि महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जमातीच्या मागण्यांमध्ये 14 बोगस आदिवासी आमदार व दोन बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, आदिवासी विकास विभागात केलेल्या सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, बोगस जातचोर प्रधान, अंध, पवार, नाईक, … Read more

Breaking News : “यापुढे कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही…’; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

लातूर – जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील कॉफी शॉपसाठी नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्यात यापुढे आता कोणत्याही कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. सोबतच प्रत्येक कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही असणे देखील बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार आहे. प्रशासनाचा या निर्णयाचे लातूरकरांनी स्वागत केले आहे. गेल्या … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

सातारा  -साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी पदभार स्विकारणार आहेत. जिल्हाधिकारी जयवंशी यांना महाबळेश्‍वर येथील अतिक्रमणे व मॅप्रो गार्डन नोटीसही प्रकरणे भोवल्याची चर्चा आहे. दहा वरिष्ठ प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी मंत्रालयातून जाहीर झाले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे … Read more

जयस्तंभ अभिवादन सोहळा : कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

पुणे :- पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार कोणतीही … Read more