शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा शैक्षणिक खर्च विद्यापीठ करणार

  कोल्हापूर /प्रतिनिधी : शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात अगर संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील रामचंद्र हरी … Read more

‘सरपंच, उपसरपंचांच्या रिक्त झालेल्या पदांची निवड होणार’

थेऊर (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही जिल्हयातील सरपंच किंवा उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे अथवा इतर कारणाने रिक्त झालेल्या पदाची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी. सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाने एका परिपत्रकाद्वारे बजावले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच अथवा उपसरपंच यांच्या … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात १५ निवारागृहांमध्ये ८०४ जण संस्थात्मक अलगीकरणात

कोल्हापूर : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 166 आणि परराज्यातील 638 अशा एकूण 804 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 22 परराज्यातील 6 अशा 28 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील … Read more

आंतरराज्यीय गुटखा तस्करी करणाऱ्या ‘एमडी’ गॅंगवर मोका

कोल्हापूर : गुटखा तस्करीमध्ये सक्रीय असणाऱ्या आंतरराज्यीय एमडी गँगवर मोका अंतर्गत आज कारवाई करण्यात आली. मोका अंतर्गत गुटखा तस्करांवर कोल्हापूर पोलीसांनी कारवाई केल्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादी चाँदपाशा व त्याचा मित्र नरसिंह मूर्ती टुमकुर (ता. निलमंगला, जि.बेंगलोर) कर्नाटक येथून त्याच्या ताब्यात विमल गुटख्याचे 150 … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय : धनंजय मुंडे

कोल्हापूर – कोरोना या साथीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे दि. 21 व 22 मार्च रोजी होणारी परिषद पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद भरली होती. ही परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने … Read more

राधानगरी अभयारण्यात भीषण आग

आग विझवण्यासाठी तरुणाईचे प्रयत्न कोल्हापूर : कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात बुधवारी वनवा पेटला. अभयारण्यात लागलेल्या आगीमुळे शेकडो एकर परिसरातील जैवविविधतेची हानी झाली आहे. आगीचा इतकी भीषण होता की,शेकडो एकर परिसरातील वनसंपदा जळून बेचिराख झाली आहे. कोल्हापूर काळम्मावाडी मार्गावर गैबी वन तपासणी नाक्यापासून अवघ्या कांहीं अंतरावर ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात … Read more

पानसरे यांच्या खुनाच्या तपासात गंभीरपणे लक्ष घालू- गृहराज्यमंत्री

कोल्हापूर : कॉ. पानसरे यांच्या खुनास पाच वर्षे उलटली तरी तपास समाधानकारक झालेला नाही. गुन्हेगार फरार आहेत. गुन्ह्याचे वाहन व शस्त्रे यांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान व आयटक कामगार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने पालकमंत्री व गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील यांची भेट घेतली. मेघा पानसरे यांनी त्यांना तपासाच्या सद्य स्थिती बाबत ज्ञात माहिती … Read more

कोल्हापूरच्या पुनर्वसनासाठी 315 कोटी निधी द्या – चंद्रकांत जाधव

कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर शहरामधील पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी व नागरिकांच्या घराच्या पुनर्वसनासाठी 315 कोटी रुपयांचा मदतनिधी मिळावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी कली आहे. याबाबत त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली … Read more

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना अभियंत्याकडून 30 हजारांची मदत

कोल्हापूर : वडिलांकडून मिळालेला दातृत्वाचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा महावितरणच्या कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र  हजारे यांनी पुढे चालू ठेवली आहे. मंगळवारी (दि. 4) त्यांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यातील 5 शालेय विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 6 हजार प्रमाणे 30 हजार रुपये शालेय शैक्षणिक शुल्क भरले आहे. राजेंद्र हजारे यांचे वडील कै. लक्ष्मण राऊ हजारे शिक्षक होते. त्यांच्या हयातीत त्यांनी … Read more