क्रुरतेचा कळस : चार महिन्याच्या श्‍वानाला बेदम मारहाण करत संपवल

पुणे – जांभुळवाडी येथे वडिल आणि मुलानी चार महिन्याच्या श्‍वानाच्या पिल्लास बेदम मारहाण करत जीवे मारले. मारहाणीत त्याचा एक पाय मोडला तसेच डोक्यावर वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे आडोसा शोधत हे श्‍वानाचे पिल्लू त्यांच्या घराच्या पडवीत आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

नगर | राजकारण्यांच्या अडथळ्यामुळे निर्बिजीकरण ठप्प

नगर, (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर महापालिकेने तब्बल एक कोटी 17 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. दोन वर्षात 12 हजार 398 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला. महापालिकेला ठेकेदार मिळेना, त्यामुळे निविदेला चारदा मुदतवाढ देण्यात आली. कुत्री पकडणे आणि त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका 2021 मध्ये पुण्यातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला दिला … Read more

Indian Army Dog Unit : डॉग स्क्वॉडमध्ये भारतीय श्वानांच्या ‘या’ खास जातींचा होणार समावेश; केंद्रिय गृह मंत्रालयाने दिले आदेश

Indian Army Dog Unit – सीमा सुरक्षा दल, केंद्रिय राखीव पोलिस दल, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलासह सशस्त्र पोलिस दलांच्या तपास पथकांमध्ये भारतीय श्‍वानांच्या (Indian Army Dog Unit) जातींचा लवकरच समावेश करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्रालयाने आदेश दिले आहेत. भारतीय कुत्र्यांच्या जाती रामपूर हाउंड, हिमालयीन माउंटन डॉग हिमाचली शेफर्ड, गड्डी आणि बखरवाल आणि तिबेटी मास्टिफ लवकरच संशयित, अंमली … Read more

राहुल गांधींनी आई सोनियांना “नूरी” नावाचा कुत्रा दिला भेट, आता प्रकरण पोहोचलं कोर्टात

Rahul Gandhi And Sonia Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. कारण, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमच्या एका नेत्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. आई सोनिया गांधी यांना नूरी नावाचा कुत्रा भेट दिल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी जागतिक प्राणी दिनानिमित्त या कुत्र्याला भेट देताना … Read more

‘रेबीजमुक्‍त पुणे’चा संकल्प; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम

पुणे – कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लसीकरण होणे गरजेचे असते अन्यथा रेबीज संसर्ग होण्याचा धोका असतो. आजही रेबीजवर उपचार नसल्याने नागरिकांमध्ये जागृतीअभावी दरवर्षी रेबीजचे रुग्ण सापडतात आणि त्यांच्यासमोर मृत्युशिवाय पर्याय नसतो. पुणे शहरात सध्या एकही रेबीजचा रुग्ण नसला तरी ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातून पुण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी 15 ते 20 इतकी आहे. यामध्ये 2021-14, … Read more

भटक्‍या कुत्र्यांची समस्या थेट सर्वोच्च न्यायालयात; वकिलाला कुत्रे चावले तेव्हा आली जाग, नेमकं काय घडलं वाचा…

नवी दिल्ली  – देशभर भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर काही कारवाईची पावले कोणीच उचलत नव्हते. मात्र, जेंव्हा सर्वोच्च न्यायालयातल्या एका वकिलाला भटके कुत्रे चावले, तेव्हा थेट सरन्यायाधिशांना या समस्येचे गांभीर्य कळले. त्यानिमित्ताने भटक्‍या कुत्र्यांचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी एका वकिलाला मलमपट्टी केलेली पाहून … Read more

सिंहगड रस्त्यावर भटक्‍या श्‍वानांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

पुणे – उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या सिंहगड रस्त्यावर नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जनता वसाहत ते वडगाव पूल आणि धायरी फाटा मार्गावर मोकाट श्‍वानांचा सुळसुळाट झाला आहे. हे श्‍वान अंगावर येत असल्याने दुचाकीस्वार दडपणाखाली वाहन चालवत आहेत. सध्या पावसामुळे सर्वच रस्ते निसरडे झाले आहेत. त्यात श्‍वान अचानक अंगावर येत असून, रात्रीच्यावेळी … Read more

कुत्रा रॉड अन्‌ मांजर द्वाड…! मांजराच्या चाव्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ

पुणे – भटक्‍या कुत्र्यांच्या त्रासातून पुणेकरांची काही प्रमाणात सुटका झाली असली तरी आता भटक्‍या मांजरांच्या चाव्याने पुणेकर वैतागले आहेत. मांजराच्या चाव्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही मांजरांची नसबंदी करण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. चाव्याने काय होऊ शकते? कुत्र्यांप्रमाणेच संक्रमित मांजर देखील रेबीजने माणसाला संक्रमित करू शकते. जेव्हा संक्रमित प्राण्याची लाळ तुटलेल्या त्वचेच्या किंवा श्‍लेष्मल त्वचेच्या … Read more

बारामतीत भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; अजित पवारांनी सूचना करूनही परिस्थिती ‘जैसे थे’

बारामती/ जळोची – शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात दोन बालकांवर हल्ला करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचना करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यावरून प्रशासकीय यंत्रणा गाफील असल्याचे दिसत आहे. खत्री इस्टेटमध्ये भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षांचे बालक जखमी झाले आहे. (दि.16) दुपारी ही घटना घडली. युवान केदार … Read more

शंभर रुपयांची नोटही याच्यापेक्षा मोठी; पहा जगातील सर्वात लहान कुत्रा

नवी दिल्ली – पाळीव प्राणी म्हंटलं कि आपल्याला लगेच आठवतो तो कुत्रा. लोकांना कुत्रा पाळण्याची खूप आवड असते. कारण त्याची एक आज्ञाधारक प्राणी म्हणून ओळख आहे. ‘एक वेळ कुत्र्याला कळतं पण तुला नाही..’ हे वाक्य अनेकदा वापरले जाते. ‘कुत्रा’ या प्राण्याची बुद्धी अधिक तल्लख असल्यामुळे लष्करामध्ये शोधमोहीम पथकामध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो. तसेच कुत्र्यांना … Read more