पुणे : डॉ. प्रदीप कुरूलकरचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे – पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशोधन व विकास संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी गुरूवारी (दि. 7) हा आदेश दिला. न्यायालयीन कोठडीत डॉ. कुरूलकर यांनी अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात दोषारोपपत्र … Read more

प्रदीप कुरुलकरने झाराला सांगितली राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गोपनीय माहिती ! दोघांमधील चॅट समोर आल्याने झाला मोठा खुलासा

मुंबई – हॅनीट्रॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राफेल विमानासहित अन्य महत्वाची माहिती कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंट झाराला सांगितल्याचे समजते. … Read more

डॉ. प्रदीप कुरुलकर विरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

पुणे – हॅनीट्रॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम 3, 4 आणि 5 नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या … Read more

डॉ. प्रदीप कुरुलकरांच्या ‘पॉलिग्राफ’ची एटीएसकडून मागणी

पुणे – हनी ट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ) संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, व्हाइस लेअर चाचणी म्हणजे नेमके काय, पॉलिग्राफ चाचणी आणि या चाचणीत फरक काय, … Read more

डॉ. प्रदीप कुरुलकर न्यायालयीन कोठडीत

पुणे -डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तेथे त्यांना विशेष कक्षात ठेवले जाणार आहे. कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (16 मे) संपली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पथकाने त्यांना न्यायालयात … Read more

डाॅ. प्रदीप कुरूलकरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; येरवडा कारागृहात ठेवणार

पुणे – डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. येरवड्यात त्यांना कैद्यांच्या बराकीत ठेवले जाणार नाही. कारागृहातील विशेष कक्षात ठेवले जाणार आहे. कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (16 मे) संपली. … Read more

देशप्रेमी ते देशद्रोही… डॉ. प्रदीप कुरुलकरचा प्रवास ! आज संपणार पोलीस कोठडी

पुणे -देशाची संरक्षणविषयक संवेदनशील माहिती पुरवल्याचा ठपका ठेवत “डीआरडीओ’ संचालक प्रदीप कुरुलकरला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. कुरुलकर सध्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने त्यास मंगळवारपयर्यंत (दि.8) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आता एटीएसकडून ही पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्‍यता आहे. “डीआरडीओ’च्या इंटेलिजन्सने तब्बल सहा महिने पाळत ठेवल्यावर कुरूलकर … Read more