Pune: धायरीतील ड्रेनेजलाइनची दुरूस्ती

धायरी -सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील बेनकर वस्ती व परिसरात गेली १५ दिवस ड्रेनेजलाइन तुंबल्याने दुर्गंधी पसरल्याचे तसेच सांडपाण्याची डबकी साचून रस्ता निसरडा होत असल्याबाबतचे वृत्त प्रभातमध्ये प्रकाशीत करण्यात आले होते. यानंतर पालिका प्रशासनाची गडबड उडाली. तातडीने ड्रेनेजलाइनची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिला होता. महापालिका … Read more

पिंपरी | उघड्या ड्रेनेजलाइनमुळे अपघाताचा धोका

थेरगाव, (वार्ताहर) – पद्मजी मिलच्या समोरून सांडपाणी वाहिनी गेली आहे. या वाहिनीवरील संरक्षक झाकणे काही ठिकाणची गायब झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणार्‍या नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करून मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. थेरगावमधील पद्मजी मेलच्या जवळील ड्रेनेजलाइनची चार ते पाच ठिकाणी झाकणे गायब झाली आहेत. येथेच दुचाकी … Read more

बाणेर, पाषाण परिसरामध्ये सांडपाण्याने दलदल

बालेवाडी :एफ रेसिडेन्सीसमोर वाहत असलेले सांडपाणी आणि तयार झालेली दलदल. औंध – बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हे पाणी रस्त्यावरून ओढ्याप्रमाणे वाहत असल्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. गेले अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाइन तुंबलेल्या अवस्थेत असताना क्षेत्रीय कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. बालेवाडीतील एफ … Read more

शिल्लक अन्नपदार्थ जाताहेत थेट ड्रेनेजमध्ये; पथारी व्यावसायिकांमुळे लाइन तुंबण्याचे प्रकार

पुणे – शहरातील रस्ते, पदपथांवर विविध ठिकाणी अन्नपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांकडून पावसाळी गटारे व ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सांडपाणी, खरकटे व इतर टाकाऊ पदार्थ टाकले जातात. त्यामुळे चेंबर व ड्रेनेज लाइन तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) साकडे घातले आहे. महापालिकेस केवळ पथारी परवाना देण्याचा … Read more

महापालिकेकडून वाघोलीतील ड्रेनेजलाईन कामांसाठी निधी

पुणे – महापालिकेवर प्रशासकांची नियुक्‍ती करण्यात आल्यानंतर पालिकेत समाविष्ट गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ओरड होत असतानाच प्रशासक विक्रम कुमार यांनी वाघोली परिसरातील ड्रेनेजलाईन विकसीत करण्याकरिता अर्धसंकल्पानुसार मंजूर निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी वितरीत करण्यासह सदर काम तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधीत विभागास देण्यात आले आहेत, असे जि.प.सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके … Read more

पुणे : आमदार, नगरसेवक आमच्यासाठी बिनकामाचेच

येरवडा – आज सोडवतो, उद्या सोडवतो यातच पाच वर्ष नगरसेवकांनी घालविली. समस्या मात्र तशीच राहिली आहे. आमदारांनीही विधानसभेत तारांकित प्रश्‍न विचारला, त्यावर लवकरच ड्रेनेज लाइनचे काम सुरू होईल, असे मंत्र्यांनी सांगितले. पण, लक्ष्मीनगर गल्ली क्र.15 येथील रस्त्यावरील सांडपाणी आजही हटलेले नाही. हे नेते बिनकामाचेच आहेत. ड्रेनेजलाइनची कामे झाली नसल्याने ड्रेनेज तुंबले की जेटिंग मशिन आणायची … Read more

पुणे : ड्रेनेजलाइन तुंबल्याचे पंतप्रधानांना सांगायचे का?

येरवडा अशोकनगरमधील नागरिकांचा सवाल; नगरसेवकांचे दुर्लक्ष येरवडा – ड्रेनेजलाइनचे काम करुन द्या, यासाठी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी यांना वारंवार विनंती केली. आता, काय याकामासाठी पंतप्रधानांना सांगायचे काय? असा संतप्त सवाल येरवडा अशोकनगर निर्मल हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. येरवडा प्रभाग क्रमांक 6 येथील म्हाडा घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या निर्मल को.ऑप हॉउसिंग सोसायटी येथे साधारण 30 ते 35 … Read more

पुणे : काम कोणी करायचे? क्षेत्रीय कार्यालय-पालिका प्रशासनात वाद

दत्तनगर-आंबेगाव रस्त्यावर चेंबर पुन्हा फुटले आंबेगाव बुद्रुक – आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर-आंबेगाव रस्त्यावर मैला-सांडपाणी सातत्याने वाहत आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहनांच्या वर्दळीतून दुर्गंधयुक्त पाणी सर्वत्र उडत असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. त्यातच क्षेत्रीय कार्यालयाने काम करायचे की पालिकेच्या मुख्य खात्याने, यातून प्रशासनाकडून कामाऐवजी नवीन हद्द, जुनी हद्द, असा वाद घातला जात आहे. नगरसेवकांचेही पालिकेच्या … Read more

वर्दीतली माया; ड्रेनेज लाईनच्या खड्डयातील गायीचे वासरू काढले बाहेर

पुणे – संभाजी पोलीस चौकी मागील नदीपात्रातील उघड्या असलेल्या ड्रेनेज लाईनच्या खड्डयात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडलेले गायीचे वासरू अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

ठेकेदाराचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा ठपका

दुर्घटनेविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मागितली माहिती पिंपरी – दापोडी येथे झालेल्या दुर्घटनेविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारावर राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. दरम्यान फुगेवाडी येथील दुर्घटनेच्या दिवशी बचाव यंत्रणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेचा … Read more