किराणा दुकानातून साडेचार कोटींचे ड्रग्ज जप्त; ठाण्‍यातील दुकानदाराला अटक

ठाणे – देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी केलेल्‍या कारवाईमुळ राज्‍यात एकच खळबळ उडाली. आहे. या कारवाईत चक्‍क एका किराणा दुकानातून तब्बल साडे चार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या घटनेने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत … Read more

आता किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्याची ”औषधे”, केंद्र सरकार घेणार ‘मोठा निर्णय’

Narendra Modi । केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. सर्दी, खोकला, ताप यासाठी वापरण्यात येणारी औषधे किराणा दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकार ओटीसी अर्थात ओव्हर द काउंटर औषधांसाठी धोरण आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यावर विचार सुरू आहे. काय आहे OTC धोरण ? OTC … Read more

युरोपमध्ये पोहोचणाऱ्या अमली पदार्थांसाठी तुर्कीये बनला ‘एन्ट्री पॉईंट’, 608 किलो कोकेन जप्त

इस्तंबुल – तुर्कीयेमध्ये पोलिसांनी कोकेनचा प्रचंड साठा पकडला आहे. हा साठा देशाच्या इतिहासात आतापर्यंत पकडल्या गेलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यातील तिसरा मोठा साठा आहे. तब्बल ६०८ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे, असे देशाचे गृहमंत्री अली यार्लिकावा यांनी सांगितले. (Turkey becomes ‘entry point’ for drugs reaching Europe, 608 kg of cocaine seized) युरोपमध्ये पोचणाऱ्या अमली पदार्थांसाठी … Read more

‘हवी तेवढी दारू प्या, पण…’; यो यो हनी सिंगचा चाहत्यांना सल्ला

Yo Yo Honey Singh Advice to Fans|

Yo Yo Honey Singh Advice to Fans|  प्रसिद्ध रॅपर हनी सिंग याने एकेकाळी तरुण वर्गात मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र मध्यंतरी हनी सिंग अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होता. त्याची गाणीही प्रदर्शित होणं बंद झाली होती. अनेक वर्षांनी यो यो हनी सिंगंने संगीतविश्वात पुनरागमन केले आहे. यातच आता हनी सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

कॅन्सरच्या रूग्णांना दिली गेली नकली इंजेक्शन; ‘या’ बड्या हॉस्पिटलशी होता संबंध, चार कोटी रुपयांची औषधे जप्त

Fake injections | cancer patients : कर्करोगाची अर्थात कॅन्सरची नकली औषधे विकणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि गुरूग्राम येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन जण दिल्लीतल्याच एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना करणाऱ्या रूग्णांना बऱ्याच काळापासून हे भामटे फसवत होते असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी या … Read more

गुजरातमधून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्‍स्‌ जप्‍त; तब्बल इतक्या कोटींचे….

Gujarat – अंमली पदार्थ तस्करांविरोधात गुजरात पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई यशस्वी झाली आहे. अरबी समुद्रातील पोरबंदर येथे संयुक्त कारवाई तब्‍बल 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई एटीएस, गुजरात पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि तटरक्षक दलाने संयुक्‍तपणे केली. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 11 मार्चच्या रात्री एका गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या संयुक्त कारवाईत समुद्रात … Read more

Pune: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलीस मित्र संघटनेतर्फे गौरव

पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, मनिष सोनिग्रा, चैतन्य जगताप, दीपक जोशी, महिला पदाधिकारी बॉबी करणानी, पल्लवी गाडगीळ, गीता जेसवानी, शालू परिहार, अंजली तुरारे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते … Read more

Pune: ती पावडर ड्रग्ज तयार करण्यासाठीचीच !

पुणे – धानोरी येथे टेम्पो सापडलेल्या संशयित ३४० किलो ड्रग्ज पावडरसंदर्भात अनेक मोठ्या “लिंक’ हाती येण्याचा अंदाज आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुडो एफेड्राइन नावाची ही पावडर असल्याचे समजते. ही पावडर कफ सिरप तयार करण्यासाठी वापरण्यात येते. तसेच त्याच्यापासून क्रिस्टल मेथ नावाचे उच्चप्रतीचे ड्रगही बनवले जाते. ही पावडर नऊ गोण्यांमध्ये … Read more

Pune: मेफेड्रोनचा तब्बल ३४० किलो कच्चा माल हस्तगत

पुणे – मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून ताब्यात घेतलेल्या सुनील बर्मनच्या चौकशीत पुणे पोलिसांना तब्बल ३४० किलो संशयित ड्रग्ज पावडर सापडली आहे. या पावडरची पोती भरलेला एक टेम्पो धानोरी परिसरातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. ही पावडर तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, ही पावडर कुरकुंभ येते मेफेड्रोन बनविण्यासाठी … Read more

Pune: ड्रग्जचे पैसे हवालामार्गे वळवले

पुणे – पुणे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख डीलर हैदर शेख याने राज्यभरासह दिल्ली येथे ड्रग्ज पाठवल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज विक्रीतून आलेले पैसे हैदरने हवालामार्फत दिल्लीला पाठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हैदरसह आठ आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या … Read more