Pune: नोंदणी न केलेल्या वाहन विक्रेत्यांचा शोध; कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओ प्रशासनाला जाग

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) खडबडून जागे झाले आहे. नोंदणी न करता रस्त्यावर आणलेल्या वाहनांची तपासणी मोहीम आरटीओने सुरू केली. यामध्ये मागील दहा दिवसांत ११ विनानोंदणी वाहने आढळली. तर ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेत ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २ अल्पवयीन चालक वाहन चालवताना आढळून आले आहेत. कल्याणीनगर अपघातात … Read more

नागपूरमध्येही ड्रंक अँन्ड ड्राइव्ह ! मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत चिमुकल्‍यासह ७ जण जखमी

Nagpur | Drunk and drive – पुण्यातील कल्याणीनगर येथील घटनेचे पडसाद राज्‍यभर उमटत असतानाच नागपुरातही ड्रंक अँन्ड ड्राइव्हची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिन्याच्या चिमुकल्यासह ७ जण जखमी झाले आहेत. यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्‍यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा … Read more

Pune: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी ‘टार्गेट’ पुरतीच!

पुणे – शहरात मद्यपी वाहनचालकांवर नियमित कारवाई होणे जवळपास बंदच झाले आहे. तर, “ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी “टार्गेट’पुरतीच उरली आहे. त्यामुळे हे मद्यपी वाहनचालक “सुसाट’ धावत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांत पाहिले असता, केवळ टार्गेट असते म्हणून दि. ३१ डिसेंबरच्या रात्री आणि मार्च एण्डच्या तोंडावर दंड “वसुली’पुरती कारवाई केली जाते. त्याला विशेष मोहीम असेही नाव … Read more

दारू पिऊन गाडी चालवली, पोलिसांना शिवीगाळ केली, प्रसिद्ध अभिनेत्रीची कोठडीत रवानगी

मुंबई – जुहू या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात अभिनेत्री काव्या थापर हिने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका थांबलेल्या वाहनाला धडक देण्याचा प्रकार गुरूवारी पहाटेच्या सुमाराला घडला. या प्रकारानंतर तिने तेथे आलेल्या पोलिसांशीच हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये … Read more

मद्यपी चालकांवरील कारवाईला लॉकडाऊनचे “टाळे’

करोना संसर्गामुळे ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे कारवाई बासनात पुणे – करोना संसर्ग वाढीस लागल्यानंतर राज्यभरातील पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबविली आहे. अशा प्रकारच्या कारवाईत संसर्गाची जोखीम होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई थांबविण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यामुळे यंदा शहरात गटारी अमावस्ये दिवशी मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली नाही. इंग्रजी नववर्षाचे स्वागत … Read more

पिंपरीत 202 तळीरामांवर कारवाई

पिंपरी – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई भोसरी पोलिसांनी केली. तर सर्वात कमी कारवाई चाकण पोलिसांच्या हद्दीत झाली. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पोलीस शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करतात. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या संशयित चालकांची पोलिसांनी ब्रीद ऍनालायजरच्या साहाय्याने … Read more

थर्टीफर्स्टच्या रात्री साडेचारशे तळीरामांवर पोलिसांची कारवाई

पुणे – थर्टीफर्स्टच्या रात्र विनाअपघात विनागालबोट पार पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. योग्य ते नियोजन, नाकाबंदी आणि कडक बंदोबस्तामुळे कुठेही अपघाताची घटना घडली नाही. तर दुसरीकडे साडेचारशे तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मोहिमेत पोलिसांनी एकूण 1 हजार तळीरामांवर कारवाई केली आहे. वाहतूक विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली होती. मद्यपानकरून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई … Read more

दहा महिन्यांत 1664 तळीरामांवर खटले

न्यायालयाने 319 जणांना केली दंडात्मक शिक्षा : काहींचा परवानाही निलंबित कारवाई आणखी तीव्र करण्याचा वाहतूक पोलिसांचा इशारा पिंपरी – दारु पिऊन सुसाट वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अनेकदा कारवाई करतात. मात्र कारवाईनंतर काय, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. गेल्या दहा महिन्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एक हजार 664 जणांवर वाहतूक … Read more

मद्यधुंद अवस्थेत ‘शिवशाही’ चालविणारा ताब्यात

पुणे – दारुच्या नशेत रॉंग साईडने बेदरकारपणे महाबळेश्‍वरच्या दिशेने शिवशाही घेऊन निघालेल्या बसचालकास स्वारगेट वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याची तपासणी केली असता त्याने मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन केल्याचे समोर आले आहे. यावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते. पवन जगन तोडकर असे या शिवशाही चालकाचे नाव आहे. स्वारगेट स्थानक परिसरात रविवारी वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहनांवर कारवाई सुरू होती. … Read more

पुणे – मद्यपी वाहनचालक ‘बुंगाट’

नियम तोडणाऱ्यांत 80 टक्के प्रमाण “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’चे पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. दोन्ही शहरांत मिळून साधारणपणे दररोज असे 60 गुन्हे न्यायालयात दाखल होत आहेत. विशेषत: त्यामध्ये मद्य पिऊन गाडी चालविण्याचे (ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह) प्रमाण तब्बल 80 टक्के आहे. शिवाजीनगर न्यायालयात 1 मार्च 2018 ते फेब्रुवारी 2019 … Read more