Pune: डीएसके यांच्यावरील गुन्हे सिद्ध करावेत; ठेवीदारांच्या वकिलांचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र

पुणे – ठेवीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर जवळपास ११ कलमांसह विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पण, त्यांच्यावरील गुन्हे अद्याप पोलिसांकडून सिद्ध झाले नसल्याने या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यास सात वर्षांत मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आणि विशेष सरकारी वकील यांनी डीएसके यांच्यावरील गुन्हे … Read more

पुणे | डीएसके यांना मिळाली बंगला, कार्यालयात प्रवेशाची परवानगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता. डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर “सप्तश्रृंगी’ नावाचा बंगला आहे. … Read more

PUNE: डीएसकेंची जप्त मालमत्ता मुक्त करू नये; मुंबईच्या विशेष न्यायालयात ठेवीदारांची मागणी

पुणे – ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावे असलेली मात्र जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात येवू नये, असा लेखी युक्तिवाद ठेवीदारांनी मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केला आहे. डीएसकेडीएल कंपनी विकत घेतलेल्या अशदन प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडने डीएसके प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या १५३ स्थावर मालमत्ता मुक्त करण्यात याव्यात, याबाबतचा … Read more

पुणे : डीएसके यांच्या 195 मालमत्तांच्या लिलावास परवानगी द्या

मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा मुंबई येथील न्यायालयात अर्ज पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या 195 स्थावर मालमत्ता जप्त आहेत. या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी मुंबई येथील एमपीआयडी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात केला आहे. सध्याच्या बाजार मूल्यानुसार … Read more

डीएसके प्रकरण : ठेवीदारांचे पैसे परत मिळविण्यासाठी काय केले?

पुणे  – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी काय कार्यवाही केली याची माहिती देणारे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सरकारी वकिलांना दिला आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश शर्मिला देशमुख आणि ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. … Read more

जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास डीएसकेंचा विरोध

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या भागीदारी कंपन्यांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यास डीएसके यांनी विरोध केला आहे. ठेवीदारांकडून करण्यात आलेला अर्ज कायद्याच्या नजरेत सक्षम नाही. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा, असे लेखी म्हणणे डीएसके यांच्या वकिलाने न्यायालयात सादर केले आहे. डीएसके यांच्या आतापर्यंत 335 स्थावर मालमत्ता … Read more

डीएसके घोटाळा : ‘डीएसकेडीएल’च्या अडीच कोटी शेअर्सचे मूल्य शून्य

पुणे – लाखो गुंतवणूकदार, ठेवीदारांनी उभी केलेली डीएसके समुहातील डीएसकेडीएल कंपनीचे अस्तित्व संपले आहे. “घराला घरपण देणारी माणसं’ अशी टॅगलाइन वापरून सामान्यांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या “डीएसकेडीएल’ कंपनीचे सर्व समभाग आता मातीमोल झाले आहेत. कंपनी अवसायनात गेल्यानंतर जुलैमध्ये मुंबईतील अंशदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ताबा घेतला. त्यावेळी झालेल्या करारानुसारच कंपनीतील सहभाग नष्ट … Read more

Pune: गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरण: डीएसके पुत्र शिरीष यांचा जामीन फेटाळला

पुणे – आकर्षक परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे पूत्र शिरीष यांचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. या प्रकरणात 30 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, … Read more

डीएसके यांचे सीलबंद घरात चाेरट्यांचा डल्ला

पुणे –  प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक घाेटाळा प्रकरणी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात कुटुंबा समवेत बंदिस्त आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांचे घरावर जप्तीची कारवाई करत ते सीलबंद केले आहे. मात्र, चाेरटयांनी संबंधित अलिशान बंगल्याचा दरवाजाचा कडी-काेयंडा उचकटून घरात प्रवेश करुन सुमारे सात लाख रुपयांचे ऐवजचावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात … Read more

“डीएसके’ला कर्ज दिलेल्या संस्थांची शनिवारी बैठक

नवी दिल्ली – मोठ्या कर्जाचे ओझे असलेल्या पुण्यातील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स म्हणजे डीएसके या कंपनीला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची बैठक शनिवारी होणार आहे. डीएसकेच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी काही बोली आल्या आहेत. या बोलीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स कंपनीने शेअर बाजाराला कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, शनिवार, दिनांक 3 जुलै … Read more