ई-कॉमर्सविरोधात तक्रारी वाढल्या; तक्रार निवारण यंत्रणा अपुरी

नवी दिल्ली – भारतात डिजिटायझेशन वाढत असल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्याकडून खरेदी वाढत आहे. मात्र या कंपन्यांनी ग्राहकांच्या तक्रार निवारण्यासाठी तयार केलेली यंत्रणा मजबूत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे येणाऱ्या तक्रारीत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली. सिंह यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात ई-कॉमर्स ग्राहकाच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे … Read more

ई-कॉमर्स मधील थेट परकीय गुंतवणुकीच्या त्रुटी दूर कराव्यात; पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे सरकारला आवाहन

नवी दिल्ली – भारतामध्ये ई-कॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मात्र कायद्यातील त्रुटीचा दुरुपयोग करून काही गैरप्रकार घडत आहेत. यासाठी केंद्र सरकारने ई- कॉमर्समध्ये थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआयबाबत काही स्पष्टीकरणाची गरज असल्याचे मत पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने व्यक्त केले आहे. या संस्थेने या संबंधात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे पत्र … Read more

पारंपरिक व्यापारापुढे आव्हानांचे डोंगर

दुकानाऐवजी मॉलमधून किराणा आणि इतर वस्तू खरेदीचा वाढलेला ट्रेंड, सवलत, अगदी एक वस्तूपासून लागेल तितक्‍या वस्तू थेट घरपोच करणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी पारंपारिक स्थानिक व्यापारापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पारंपारिक व्यापार कमी होत असल्याची खंत व्यापारी नेहमीच व्यक्‍त करतात. त्यामुळे मॉल, ई-कोमर्स, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी पारंपरिक व्यापाऱ्यांना व्यापारामध्ये काळानुसार बदल करण्याची आवश्‍यकता आहे. पूर्वी … Read more

बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर; सरकारचे ओपन ई- कॉमर्स नेटवर्क सुरू

नवी दिल्ली- सरकारच्या वतीने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हे नेटवर्क भारतातील पाच शहरांमध्ये सुरू करण्यात आले असून आगामी काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. यूपीआयमुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहार ज्या पद्धतीने वाढले. त्याच प्रकारे भारतातील ई-कॉमर्स ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या मदतीने वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू … Read more

ई-कॉमर्स क्षेत्रात TATAची एन्ट्री; छोट्या कंपन्यांना होणार मोठा फायदा

मुंबई – टाटा समूहाने टाटा न्यू हे ऍप सादर करून ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा न्यू हे ऍप ओपन आर्किटेक्‍चरवर आधारित आहे. त्यामुळे या ऍपवरून इतर कंपन्यांनाही आपल्या वस्तू आणि सेवा विकता येणार आहेत. 7 एप्रिल रोजी हे ऍप सुरू झाल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 22 लाख लोकांनी … Read more

वस्त्र, फूटवेअर, ई कॉमर्सवर व्यापाऱ्यांची गोयल यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – कापडावरील जीएसटी वाढऊ या व इतर मागण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) महाराष्ट्राचे शिष्ट मंडळ केंद्रीय उद्योग व वाणीज्य मंत्री पियुश गोयल यांना भेटले. कॅट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश भाई ठक्कर म्हणाले की, कापडावरील जीएसटी 5% वरून 12% पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावरी करू नये. वस्त्रोद्योग मंत्रालयाने जीएसटीत वाढीऐवजी कपड्यांवरील सध्याच्या पातळीवर जीएसटी … Read more

‘ई-कॉमर्स’ मुद्यावर व्यापारी पंतप्रधानांशी चर्चा करणार

नवी दिल्ली – ई-कॉमर्स धोरण आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अनेक हरकती आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्याच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात पत्र पाठविले आहे. जागतिक पातळीवरील ई- कॉमर्स कंपन्या भारतामध्ये 2016 पासून … Read more

फ्लिपकार्टचा किराणा क्षेत्रात विस्तार

बंगळुरू – फ्लिपकार्टने किराणा सेवेचा विस्तार 50 हून अधिक शहरांमध्ये केला आहे. यामुळे सात महानगरे आणि आसपासच्या 40 हून अधिक शहरांमधील वापरकर्त्यांना सेवा मिळणार आहे. कोलकाता, पुणे आणि अहमदाबाद, मैसुर, कानपूर, वारांगल, अलाहाबाद, अलिगढ, जयपूर, चंडिगढ, राजकोट, बडोदे, वेल्लोर, तिरुपती आणि दमण या शहरात सेवा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोव्हीडमुळे लोक ई-कॉमर्सकडे वळले … Read more

अ‍ॅमेझॉनवर बंदीची मागणी : “कॅट’कडून आज भारत बंदचे आवाहन

नवी दिल्ली – देशभरातील व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटकडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज शुक्रवार, दि. 26 रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी व्यापार्‍यांकडून करण्यात आली आहे. भारत बंदला देशभरातील बाजार बंद राहणार आहेत. सर्व प्रकारचे व्यापार ठप्प राहणार आहेत. देशातील सर्व … Read more

खादी मंडळाचा फ्लिपकार्टशी सहकार्य करार

मुंबई – फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स बाजारपेठेने महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (एमएसकेव्हीआयबी) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर उद्योग मंत्री सुभाष देसाई याचंया उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांना खादी, पैठणी साड्या, लाकडाची खेळणी, हाताने बनवलेल्या वस्तू, दागिने, … Read more