“आर्थिक महासत्ता बनताच बेरोजगारी हटणार” – पंतप्रधान मोदी

मेरठ – जेव्हा भारत ही जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, तेव्हा देशातील गरिबीचे प्रमाण वाढत होते. जेव्हा भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तेव्हा २५ कोटींहून अधिक लोकांना यशस्वीरित्या गरिबीतून बाहेर काढण्यात आले. आता जेव्हा आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा केवळ गरिबीच नाहीशी होणार नाही तर ‘नवा मध्यमवर्ग’ भारताच्या विकासाला चालना देईल. … Read more

अरे बापरे…! 270 दूध, 800 चिकन, 2500 चा चहा… पाकिस्तानात ‘महागाईचा बॉम्ब’ फुटला

कराची – पाकिस्तानात महागाईने असा कहर केला आहे की, आधी किचनमधून पीठ गायब झाले, मग बिस्किटे, नाश्ता गायब झाला आणि आता चहा, दूध, चिकन मिळणेही कठीण झाले आहे. . दररोज महागाई नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. पाकिस्तानच्या बंदरांवर माल पोहोचला आहे पण तो सोडण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. येथे दुधाचा दर प्रतिलिटर 210 रुपयांवर पोहोचला आहे. … Read more

पाकिस्तानवर आर्थिक संकट; परकीय गंगाजळीत मोठी घट, रुपयाचे मूल्य झाले कवडीमोल

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये केवळ पाच अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असतांनाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला द्यावयाची मदत तेथील राजकीय अस्थिरतेमुळे काही काळ स्थगित केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपयाचा भाव तब्बल 1.09 टक्‍क्‍यांनी म्हणजे 2 रुपये 5पैशांनी कोसळून 189 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. पाकिस्तान मध्ये या आठवड्यामध्ये प्रचंड … Read more

देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, पण सरकार निवडणुकीच्या राजकारणात गुंतलेय – यशवंत सिन्हा

नवी दिल्ली – सध्या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकिची झाली असून सरकार निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे या आर्थिक हालाकिच्या स्थितीकडे लक्ष नाही असे तृणमुल कॉंग्रेसचे नेते व वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. सरकारने लोकानुनय करण्याच्या योजनांवर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठा खर्च केला. त्याचाही विपरित परिणाम देशाच्या अर्थकारणावर झाला आहे … Read more

भारताची आर्थिक परिस्थिती बिघडली, रोजगार निर्मिती मंदावली

अलिबाग – देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. विषमता वाढत चालली आहे. रोजगार निर्मिती होत नाही. शिक्षण, आरोग्याचे खाजगीकरण होत चालले आहे. याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडे सशक्त धोरण नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे सहयोग पतसंस्थेच्या अलिबागच्या वतीने आयोजित भारताची विद्यमान अर्थव्यवस्था या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत … Read more

घरावर ठेवला 150 किलोचा कांदा; कारण आहे खुपच खास

नाशिक – येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव आणि अनिल भगवंत जाधव या दोघा भावंडांनी घरावर 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. या घराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून या भागात येणाऱ्यांचे हा कांदा लक्ष वेधून घेत आहे. कांद्याच्या उत्पादनातून मिळालेल्या पैशातून घर बांधले. कांद्यामुळे आर्थिक भरभराट झाली म्हणून घरावर 150 किलो कांद्याची … Read more

रिऍल्टी क्षेत्रात उमेद वाढली

मुंबई – जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यातील घर विक्रीत तीन पटीने वाढ झाली असल्याचे एका संस्थेच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. या तिमाहीत पुण्यात 5,921 इतक्‍या घरांची विक्री झाली .गेल्या वर्षी या तिमाहीत पुण्यात केवळ 1,344 इतक्‍या घरांची विक्री झाली होती. जे एल एल इंडिया या संस्थेने देशातील आठ मोठ्या शहरातील घर विक्रीच्या आकडेवारीचा अभ्यास … Read more

‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : डॉ. भागवत कराड

पुणे – करोनाच्या संकटाला न घाबरता बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी धैर्याने तोंड देत माणुसकी जपत ‘अर्थचक्र’ सुरू ठेवले. त्यामुळे करोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलिस यासह बँक कर्मचऱ्यांनी दिलेले योगदान महत्वाचे असून ते विसरता येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. करोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची … Read more

टोयोटो कंपनीच्या कार महागणार

नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे कार कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे. त्यामध्ये टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनी सामील झाली आहे. आज या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कंपनीद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व मॉडेलच्या दरात दोन टक्के वाढ करण्यात येणार आहे. हा निर्णय एक ऑक्‍टोबर पासून अंमलात येणार आहे. पोलदासह कारला … Read more

कोरोनाच्या संकटामुळे लोकांवरील कर्जाचे ओझे दुप्पट

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. जवळपास समाजातील सर्वच घटकांवर याचा परिणाम झालेला आहे. सामाजिक घटकांची अवस्था सुद्धा बिकट झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका आर्थिकतेला बसला. कोरोनाकाळापूर्वी देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती. कोरोनामुळे तर लोकांवरील कर्जाचा ओझा दुपटीने वाढला आहे. यादरम्यान 18 राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील सरासरी कर्ज वाढून दुपटीहून अधिक … Read more