अफगाणिस्तानातील खासगी उद्योगापुढे आर्थिक संकट ; गोठवलेला निधी खुला करण्याचे अमेरिकेला आवाहन

काबूल – अफगाणिस्तानातील खासगी उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून अमेरिकेने गोठवलेला निधी तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी तेथील खासगी उद्योगांनी केली आहे. अफगाणिस्तान चेबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इन्व्हेस्टमेंट, अफगाणिस्तान चेंबर ऑफ माईन्स ओऍओन्ड इंडस्ट्रीने एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.  मानवतेच्या कारणास्तव अमेरिकेने जर गोठवलेला निधी तातडीने खुला केला नाही तर अफगाणिस्तानातील उद्योग … Read more

रुपया दोन आठवड्याच्या नीचांकावर

मुंबई – शेअर बाजारात झालेली विक्री आणि इतर कारणामुळे रुपयाच्या मूल्यात सोमवारी 18 पैशांची घट होऊन रुपयाचा दार दोन आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आला आहे. या घटनाक्रमालाबद्दल विश्‍लेषकांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये महागाई वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता असल्यामुळे जागतिक चलन बाजारात डॉलरचा दर वधारत असल्यामुळे रुपया सह इतर चलनांच्या मूल्यावर दबाव … Read more

Pune Crime : ‘बीएचआर’चा मुख्य सूत्रधार अखेर जाळ्यात

पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी सुनील देवकीनंदन झंवर (रा.जय नगर, जळगाव) याला मंगळवारी (दि. ९) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या पतपेढीविरुद्ध फसवणूक … Read more

खासगी गुंतवणूक सक्रीय नाही – रिझर्व्ह बॅंक अहवाल

मुंबई – केंद्र सरकार कर्ज घेऊन खर्च करीत आहे. इतरही सर्व आघाड्यावर जोरदार हालचाली चालू आहेत. मात्र भारतातील खासगी गुंतवणूक आणखी सक्रीय नसल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. विविध अभ्यास अहवालातून मागणी वाढू लागल्याचे दिसत आहे. मात्र याची दखल खाजगी क्षेत्राने घेतलेले नाही असे नमूद करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत सर्व क्षेत्रांनी … Read more

प्राप्तिकर विवरण भरणे आता आणखी सुलभ

प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक पैलूतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या अपेक्षा असतात. प्रत्यक्ष कराबाबत सांगायचे झाल्यास, नागरिकांसाठी प्राप्तिकर महत्त्वाचा असतो. यात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. पगारदार वर्ग आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रमाणित कपात अद्याप कायम आहे. 2020-21 मध्ये जाहीर केल्याप्रमाणेच वैयक्तिक करदात्याला कर द्यावा लागेल. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या … Read more

गुंतवणूक करताय? मग ‘हे’ प्राथमिक नियम माहितीच हवे

1) आपल्या उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम निवृत्तीसाठी योग्य आर्थिक पर्यायामध्ये गुंतवा. आपल्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळापासून मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम जर निवृत्तीच्या गरजांसाठी गुंतवण्यास सुरवात केली तर निवृत्तीपर्यंत आवश्‍यक रक्कम निश्चित उभी राहू शकते. कमी महागाई दर आणि मोठी पेन्शन मिळण्याचे दिवस निघून गेले आहेत. वेळोवेळी आपल्या जीवनशैलीमध्ये कायम सुधारणा होत असतात. त्यासाठीचे खर्च … Read more

देशाचा विकासदर चालू वर्षी उणे 7.7 आणि पुढील वर्षी 11 टक्के होण्याची शक्‍यता – आर्थिक सर्वेक्षण

नवी दिल्ली – करोरनाच्या संकटामुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर उणे 7.7 टक्के इतका कमी राहणार आहे. तथापि पुढील आर्थिक वर्षात तो चांगला वाढेल आणि किमान अकरा टक्के दराने तो वाढण्याची शक्‍यता आहे. हा आर्थिक विकास इंग्रजी व्ही आकारात होत आहे असे निरीक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नमूद … Read more

‘होम फर्स्ट फायनान्स’चा IPO 21 जानेवारीपासून; एवढी आहे ‘शेअर’ची किंमत

मुंबई –  होम फर्स्ट फायनान्स कंपनीची प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओ 21 जानेवारी रोजी खुली होणार असून 25 जानेवारी पर्यंत हे विक्री चालेल. या आयपीओमधील शेअरची किंमत 517 रुपये ते 518 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 1,153 कोटी रुपये जमा करण्याचे ठरविले आहे. काही कर्मचाऱ्यांना शेअर खरेदीसाठी प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. … Read more

औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीवर

नवी दिल्ली-  औद्योगिक उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत असूनही या क्षेत्रात समाधानकारक प्रगती होत नसल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढ उणे 1.9 टक्के इतकी मोजली गेली आहे. सरकारने यासंदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 2.1 टक्के वाढ झाली होती. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील उत्पादकता कमी … Read more

बजाज ऑटोचे बाजार मूल्य एक लाख कोटीवर; जगातील पहिलीच दूचाकी कंपनी

मुंबई – बजाज ऑटोचे शेअर बाजारातील मुल्य शुक्रवारी एक लाख कोटी रुपयांवर गेले. जगात एवढे बाजार मूल्य असलेली बजाज ऑटो ही पहिलीच दुचाकी कंपनी आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारावर बजाज ऑटोच्या शेअरचा भाव 3,479 रुपये आहे. बजाज ऑटो दुचाकी क्षेत्रात 75 वर्षापासून कार्यरत आहे. कंपनीने गेल्या काही वर्षात मोटर सायकल निर्मितीवर भर दिला असून कंपनी … Read more