रोहित पवारांवरील ED कारवाई सूडबुद्धीने; ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे उपोषण

जामखेड – कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा आरोप करत कर्जत जामखेड मतदार संघातील नागरिकांसह राज्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण केले. “कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला … Read more

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 17 विरोधी पक्षांचा ईडी कार्यालयावर मोर्चा

नवी दिल्ली – हिडेनबर्ग अहवालानंतर अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक काही दिवसांपासून संसदेत अदानीशी संबंधित मुद्दे सातत्याने उपस्थित करत आहेत. मात्र, केंद्र सरकार अदानी प्रकरणावर लक्ष देत नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत निवेदन देण्यासाठी संसद ते ईडी कार्यालयापर्यंत आज मोर्चा काढण्यात आला. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निषेध मोर्चादरम्यान सांगितले की, अदानी घोटाळ्याप्रकरणी … Read more

ईडीच्या कार्यालयात राहुल गांधींची चौकशी सुरु; बाहेर कार्यकर्ते आक्रमक; जाळपोळ करत केले आंदोलन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी नुकतीच ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन जाळपोळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी … Read more

राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर; शेकडो कार्यकर्त्यांची कायार्लयाबाहेर गर्दी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नुकतेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानुसार राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तसेच हातात पोस्टर घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. #WATCH Congress leader Rahul Gandhi surrounded by … Read more

राहुल गांधी आज ईडीच्या कार्यालयात राहणार हजर; देशात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी  राहुल गांधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. त्या अगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली असून केंद्राप;की विरोधातही नारेबाजी करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. यावेळी राहुल यांच्या समर्थकांनी … Read more

राष्ट्रवादीची थेट ईडी कार्यालयावर धडक ! भाजप नेत्यांवरील गुन्ह्यांबाबत विचारणार जाब

मुंबई – ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचे काय झाले? भाजप नेत्यांची चौकशी का केली नाही? त्यांना न्यायालयात का उभे केले नाही? असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे … Read more

मोठी बातमी! अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर; जबाब नोंदवण्याची शक्यता

मुंबई : गेल्या  अनेक महिन्यांपासून  गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सर्वांच्या समोर आले आहेत.  आज  अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची  सांगण्यात येत आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावले होते. मात्र, … Read more

भाजपच्या भ्रष्ट नेत्यांवर ‘ईडी’ कारवाई का करत नाही?

मुंबई –  सध्या राज्यातील ठाकरे सरकारच्या नेत्यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जात असून भाजप पक्ष केंद्रातील सत्तेचा म्हणजेच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्‍सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न  आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस,शिवसेना या पक्षातील बड्या नेत्यांवर  ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्‍सची कारवाई करून भाजप पक्ष सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप आज च्या … Read more

“वर्षा राऊत पुन्हा हाजीर हो; ईडीकडून चौकशीसाठी समन्स”

मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत  काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. तर आता पुन्हा वर्षा राऊत यांना ईडीने  समन्स बजावलं असून 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांची तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली होती. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर … Read more

PMC Bank Scam: ईडी कार्यालयात वर्षा राऊत यांची 3 तासांहून अधिक वेळ चौकशी

मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली आहे. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बॅंक प्रकरणी … Read more