दिल्ली वार्ता: गेम चेंजर

कॉंग्रेससह तमाम बड्या विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्‌घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता, तरी आपण कोण आहोत? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं. भाजपच्या चाणक्‍यांनी असा काही डाव खेळला की नंबर गेममध्ये केंद्रानेच बाजी मारली! शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांसह कधीकाळी … Read more

दिल्ली वार्ता : विरोधकांची एकजूट?

सध्या, विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये गंभीर काथ्याकूट सुरू आहे. ते असं की, पंतप्रधान कोण होणार? हा मुद्दा बाजूला ठेवायचा आणि सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला सळो की पळो करून सोडायचं! यात विरोधक खरंच यशस्वी होणार का? हा खरा प्रश्‍न आहे. दीड वर्षानंतर अर्थात 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आणि यंदा डिसेंबरमध्ये होणारी गुजरात तसेच … Read more

47 वर्षांपुर्वी प्रभात : अजिंठा लेणीतील मूळ रंगाची तपासणी

पुणे  – केंद्र सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यामार्फत अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध चित्रांतील मूळरंग तपासण्याचे कार्य सुविख्यात असे तीन चित्रकारीतील तज्ज्ञ करत आहेत. लेणी क्र. 1-2-16 व 17 येथील ही जगप्रसिद्ध चित्रे सध्या कॅनव्हासच्या कागदावर उतरविली जात असून 20 टक्‍के काम पुरे झाले आहे. याबाबत युनेस्कोची मदत घेतली असून स्मिथोसोनीयन इन्स्टिट्यूट ऑफ अर्कालॉजी व प्रा. लरिन्स मिनेव्हस्की … Read more

कटाक्ष : लोकप्रतिनिधींवरची उधळपट्टी

भारतातील सर्व लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या सवलती, भत्ते, पगार हा सध्याच्या आर्थिक डबघाईच्या काळात नेहमीच वादाचा मुद्दा ठरत आहे. त्याबाबत… संपूर्ण जगाच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम घडविणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजातील भीषण आर्थिक विषमता! राजा आणि सरंजामदार यांच्यावर होणारा वारेमाप खर्च, त्यांना मिळणाऱ्या सवलती आणि विपन्नावस्थेत असणारा शेतकरी, कामगार वर्ग यांच्यात भीषण तफावत … Read more

विविधा : प्रभाकर आत्माराम पाध्ये

सौंदर्यमीमांसक साहित्यिक, पत्रकार व विचारवंत प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म रत्नगिरी जिल्ह्यातील लांजे येथे 4 जानेवारी 1909 रोजी झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी, मुंबई आणि पुणे येथे झाले. वर्ष 1932 मध्ये ते बीए झाले. बीए झाल्यानंतरचे पाध्ये मार्क्‍सच्या विचाराने भारावून होते. त्यानंतर प्रतिभा, चित्रा, धनुर्धारी या मासिकांचे संपादक म्हणून 1939-45 या कालावधीमध्ये त्यांनी … Read more

कटाक्ष :काश्‍मीर एक शापित नंदनवन

काश्‍मीर येथील निसर्गसौंदर्य पाहता ते खरोखरच नंदनवन आहे. पण तेथील बंदुकींच्या सावलीमुळे हे एक शापित नंदनवन ठरते. काश्‍मीर प्रश्‍न भारताच्या स्वातंत्र्यापासून सुरू असला तरीही 1990 पासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे जास्त वाढला आणि काश्‍मीर फाइल्स हा चित्रपट 1990 पासूनच्या घटनांवर आधारित आहे. 1990 साली देशात व्ही. पी. सिंग यांचं सरकार होतं आणि त्याला भाजपच्या 86 खासदारांचा … Read more

लक्षवेधी : नवा गडी नवे राज्य

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे काही नवीन चेहरे आमदार म्हणून निवडून आलेत. त्यात आम आदमी पक्षातील आमदारांचा आकडा सर्वात जास्त. वेळ सर्व काही शिकवते हे नक्‍कीच खरे आहे. पण अशा लोकांसाठी सरकारी यंत्रणेची साथही तितकीच महत्त्वाची. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार व नेत्यांसमोर कोणत्या अडचणी असतील? त्यांना लोकहिताचे कोणते निर्णय घेण्याची संधी मिळेल? … Read more

विविधा :आरती प्रभू

“आरती प्रभू’ या नावाने कविता व लेखन करणारे प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म बागलांची राई, तेंडोली (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) येथे 8 मार्च 1930 रोजी झाला. वर्ष 1937 मध्ये खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. आर्थिक अडचणी होत्याच. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचे भुसारी मालाचं दुकान होतं, … Read more

४७ वर्षांपूर्वी प्रभात: श्रम व विद्या यांची सांगड – कविवर्य बा. भ. बोरकर

पुणे – कविवर्य बा. भ. बोरकर म्हणाले, आपल्याकडे संस्कृती व शेती (श्रमाचे प्रतीक) यात कल्चर व ऍग्रिकल्चर यात दुरावा निर्माण झाला आहे. विद्या-संस्कृतीला जोड श्रमाची पाहिजे. अमेरिकेत वयाच्या 14 वर्षी विद्यार्थी स्वतःच्या पायावर आत्मविश्‍वासाने उभा राहतो. हा आत्मविश्‍वास श्रमप्रतिष्ठेने येतो. आपल्याकडे विद्यार्थी नापास झाल्याबरोबर निराश होतो; आत्महत्येकडेही वळतो. विद्यार्थ्यांमध्ये जे उत्कृष्ट असेल त्याची दखल अमेरिकत … Read more

पुस्तक परीक्षण: परम् हितकारी दिंडी!

“मध्ययुगीन परंपरेतील संत-सत्पुरुष आणि बुद्ध, महावीर,येशू,महात्मा गांधी,विनोबा यांच्यासारख्या महामानवांनी मानवी कल्याणाचा सदैव ध्यास घेतला होता.त्यांच्या वाङ्मय संचितात माणुसकी, प्रेम,भूतदया,अहिंसा अशा स्थायी मूल्यांचा उद्‌घोष आहे.काळ कितीही बदलला तरी वाङ्मयमूल्यांचे महत्त्व कमी होणारे नाही. त्यामुळे आज जागतिकीकरणाने व बाजारु व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्यांची उकलही या वाङ्मयसंचिताच्या आधारे करता येऊ शकते.पण त्यासाठी या वाङ्मयाकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी हवी.’दिंडी’ … Read more