अग्रलेख : जनादेशाचे बंधन

‘एनडीए’ आघाडीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. ‘इंडिया’च्या बैठकीत सरकार स्थापन करण्यासाठी इतक्यातच घाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते योग्य वेळेची वाट पाहणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीकडे वास्तविक हाच पर्याय होता. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची वाट पाहणे. जोपर्यंत या दोन नेत्यांची इच्छा होत नाही, तोपर्यंत ते ‘एनडीए’तून बाहेर पडणार नाहीत. … Read more

46 वर्षांपूर्वी प्रभात : कुटुंब नियोजनासाठी नवा संमिश्र कार्यक्रम….

कुटुंब नियोजनासाठी नवा संमिश्र कार्यक्रम नवी दिल्ली, दि. 6 – देशात लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे तिला आळा घालावा व लोकांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग अनुसरावा म्हणून केंद्रीय आरोग्य खात्याने एक नवा संमिश्र कार्यक्रम आखला आहे. कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे राज्यमंत्री जगदंब प्रसाद यादव यांचे नेतृत्वाखाली एक पाथक आग्नेय आशियाचा दौरा करून … Read more

अबाऊट टर्न : मस्करीजीवी

मनोरंजनाची माध्यमे काळानुरूप बदलतात, तशाच त्याच्या संकल्पनाही बदलतात. नाटक-सिनेमाच्या जोडीला छोटा पडदा आला, नंतर तो आणखी छोटा होऊन तळहाताएवढा झाला. टीव्हीवरच्या मालिका इतक्याच वेबसीरिज लोकप्रिय झाल्या. इंटरनेटच्या दुनियेत ‘सेन्सॉर’ नसल्यामुळे नव्या पिढीला ‘हवा तो’ कंटेन्ट मिळू लागला.  श्‍लील-अश्‍लीलतेच्या कल्पना जशा काळाप्रमाणे बदलत गेल्या, तसेच मनोरंजनाचे स्वरूपही बदलत गेले. माणसातले श्‍वापद बाहेर काढणारे ‘रिअ‍ॅलिटी शो’ प्रचंड … Read more

लक्षवेधी : खबरदारी हाच खरा इलाज!

संशोधकांच्या एका पथकाने अलीकडेच जागतिक सायबर गुन्हेगारी निर्देशांक तयार केला असून सायबर गुन्हेगारीत भारत जगात दहाव्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. सायबर गुन्हेगारी निर्देशांकात शंभर देशांचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारीत रशिया आघाडीवर आहे. युक्रेन दुसर्‍या, चीन तिसर्‍या, अमेरिका चौथ्या, नायजेरिया पाचव्या, रोमानिया सहाव्या आणि उत्तर कोरिया सातव्या स्थानावर आहे. भारतात नेहमीच अनेक प्रकारचे सायबर हल्ले आणि … Read more

विविधा : शंकर दीक्षित

भारतीय ज्योतिष अर्थात खगोलविज्ञान या वैज्ञानिक ग्रंथाचे लेखक, भारतीय ज्योतिष शास्त्रविशारद व गणिती शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा आज स्मृतिदिन (निधन 27 एप्रिल 1898). त्यांचा जन्म 21 जुलै 1853 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड गावी झाला.  मुरूड येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी दापोली न्यायालयात अर्ज लिहून देणे वगैरे उमेदवारीची कामे केली. त्यावेळी ते इंग्रजी शिकले. वर्ष 1870 … Read more

लक्षवेधी : पाणीप्रश्‍नी हवा सर्वंकष विचार…

‘द वर्ल्ड रिसोर्सेज इन्स्टिट्यूट’च्या मते, भारत आणि चीनसारख्या देशात पाण्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने जीडीपीचे 7 ते 12 टक्के नुकसान होऊ शकते. प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर करणार्‍या गुजरातच्या एका कारखान्यासमोर एक प्रश्‍न होता. उन्हाळा जवळ आला होता आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे पाण्याचा वापर कमी करूनही उपलब्ध होणारे पाणी कारखान्याला कमीच पडत होते. … Read more

अबाऊट टर्न : प्रदर्शनसंसर्ग…

कोविडचा जागतिक संसर्ग येऊन गेला, त्याला किती वर्षे झाली? असा प्रश्‍न आज विचारला, तर इंडियन प्रीमिअर लीग आणि इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये गुंतलेल्या कुणालाही पटकन उत्तर देता येणार नाही. या अत्यंत जीवघेणा आजाराच्या भयावह आठवणी आता जणू पुसल्या गेल्यात. जणूकाही कोविड येऊन शंभरेक वर्षे लोटली असावीत. पण मेंदूचा रेकॉर्डर थोडासा रिवाइंड करून बघितला, तर अजूनही त्या … Read more

46 वर्षांपूर्वी प्रभात : भुट्टोंच्या फाशीवर भारताने व्यक्त व्हावे….

44वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर मुंबई, दि. 4 – 44वे घटना दुरुस्ती विधेयक राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आले. उद्योगमंत्री शरद पवार यांच्यासह 108 सदस्यांनी विधेयकास पाठिंबा दिला. भुट्टोंच्या फाशीवर भारताने व्यक्त व्हावें जम्मू – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान भुट्टो यांना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर भारत सरकारने आपली भूमिका व्यक्त करावी, असे इंदिरा गांधी म्हणाल्या. इतर देशांच्या व्यवहारात … Read more

अग्रलेख : बेरोजगारीचा राक्षस…

सगळीकडे भारतीय अर्थव्यवस्थेचे तेजस्वी चित्र मांडले गेले. प्रचारबाजीही जोरात सुरू आहे. यातून जागे करणारा एक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. देशातील बेरोजगारीशी संबंधित आकडेवारी दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे या बेरोजगारांमध्ये युवकांची संख्या थोडीथोडकी नाही तर तब्बल 83 टक्के आहे.  विकास, प्रगती, उन्नती या शब्दांच्या गर्दीत ही समस्या उभीच आहे. त्यावर काही तोडगा आहे का? … Read more