अरुणाचल प्रदेशातील ‘या’ 8 मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान ; जाणून घ्या का करावे लागले मतदान ?

Arunachal Pradesh Lok Sabha ।

Arunachal Pradesh Lok Sabha । मणिपूरनंतर आता अरुणाचल प्रदेशातही फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. अरुणाचल प्रदेशातील 8 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचार झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला. येथे निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेशातील चार … Read more

‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप ठरतेय प्रभावी ! देशभरातून आचारसंहिता उल्‍लंघनाच्‍या ७९ हजारहून अधिक तक्रारी

C Vigil app : आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरू लागले असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवापर्यंत देशभरातून ७९ हजारहून अधिक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या बहुसंख्य तक्रारींचे तातडीने निवारणही करण्यात आले आहे. आयोगाकडे आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण झाले असून ८९ टक्के तक्रारी १०० मिनिटांत सोडवल्या गेल्या. … Read more

निवडणुकीत खर्च किती करायचा ? निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठी रेटकार्ड निश्‍चित.. उमेदवारांच्या खर्चावर असणार लक्ष

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागेल. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यादृष्टीने निवडणूक आयोग अत्यंत बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. … Read more

“तसे केल्यास..” निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिपण्णी

Supreme Court on Election Commissioner Appointment – दोन नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्या. न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की ते मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा अटी आणि कार्यालयाच्या अटी) कायदा, २०२३ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या मुख्य याचिकांवर लक्ष … Read more

काहीतरी गंभीर कारणावरूनच गोयल यांचा राजीनामा – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी काल अचानक राजीनामा दिल्याबद्दल ‘आश्चर्य’ व्यक्त केले आणि त्यामागील कारणावर प्रश्न उपस्थित केले. सिब्बल म्हणाले की लोकसभा निवडणुकीला केवळ काही दिवस बाकी असताना अचानक निवडणूक आयुक्ताने राजीनामा देण्यामागे काही तरी गंभीर कारण असले पाहिजे. त्यांचा कार्यकाळ संपण्यास … Read more

“CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का ?” माविआ नेत्याचं ट्विट चर्चेत

Ashok Chavan Resignation : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील राजकीय भूकंप होणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात आता राजकीय वर्तुळातून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणे आता चव्हाण देखील काँग्रेसवर दावा … Read more

“निवडणूक आयोगाच्या निकालामुळे लोकशाहीचे..” राष्ट्रवादीच्या निकालाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसविषयी दिलेल्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे लोकशाहीचे अधःपतन तथा राज्यघटनेचीही पायमल्ली होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे, असे ते म्हणालेत. ज्याच्याकडे बहुमत आहे, त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाने मंगळवारी उपमुख्यमंत्री … Read more

BREAKING ! शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव.. निवडणूक आयोगाने ‘या’ पर्यायाला दिली मान्यता

sharad Pawar : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे. शरद पवार यांच्याकडून आज (७ फेब्रुवारी)  तीन … Read more

राष्ट्रवादी अजित पवारांचीचं ! निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कोणाकडे किती लोकप्रतिनिधी ? वाचा सविस्तर..

मुंबई – राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या या विभागणीनंतर शरद पवार आणि … Read more

“फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा..” अजित पवारांकडे राष्ट्रवादी गेल्यानंतर रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेची वेळ देण्यात … Read more