पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे फेकली पाण्यात ; आयोगाने मागितला अहवाल,व्हिडीओ व्हायरल

EVM-VVPAT machines ।

EVM-VVPAT machines । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. देशात एकीकडे मतदान सुरळीत पार पडत असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीन पाण्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

३२४ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ४३ टक्के वाढ; यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली – यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या ३२४ खासदारांच्या संपत्तीचे पृथक्करण करण्यात आले. त्यानुसार, त्या खासदारांच्या संपत्तीत मागील ५ वर्षांत सरासरी ४३ टक्के इतकी वाढ झाली आहे. संबंधित खासदारांची २०१९ या वर्षात सरासरी संपत्ती २१ कोटी ५५ लाख रूपये इतकी होती. आता त्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ३० कोटी ८८ लाख रूपये इतकी … Read more

Sri Lanka Election : श्रीलंकेतील निवडणुका २ वर्षे पुढे ढकलाव्यात

कोलोंबो- श्रीलंकेतील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुका २ वर्षे पुढे ढकलण्यात याव्यात. यासाठी देशभरात सार्वमत घेण्यात यावे, असा प्रस्ताव अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीने मांडला आहे. देशात आर्थिक स्थिरता आणण्याच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अध्यक्ष आणि संसद या दोन्हीचा कार्यकाळ २ वर्षांनी वाढवण्यासाठी सार्वमत घेण्यात यावे, असेही पक्षाने सुचवले आहे. … Read more

“कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढविणार” – नाना पटोले

मुंबई – येत्या जून महिन्यात अपेक्षित असलेली विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. सहा वर्षापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती. आता या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने … Read more

तिसऱ्या टप्प्यात १ हजार ३५१ उमेदवार रिंगणात; महाराष्ट्रातील ११ जागांसाठी २५८ जणांमध्ये चुरस

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी ७ मे यादिवशी मतदान होईल. त्या टप्प्यात एकूण १ हजार ३५१ उमेदवार रिंगणात आहेत. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे जातील. महाराष्ट्रात २५८ उमेदवारांचे भवितव्य त्या टप्प्यात ठरेल. मध्यप्रदेशातील बैतुलमध्ये दुसऱ्या … Read more

रवींद्र धंगेकरांसाठी ‘राहुल गांधी, प्रियंका गांधी’ उतरणार मैदानात; पुण्यात रोड शो मार्फत करणार वातावरण निर्मीती

Ravindra Dhangekar | Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून, धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत रंगणार आहे. भाजपने त्यांच्या दुसऱ्या यादीत पुण्याची … Read more

“राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या शत्रुंना पाठिंबा दिला…”; राज्यातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली समोर

Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 | Sanjay Raut – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खरपूस टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी तयार केलेली संघटना जेव्हा महाराष्ट्राच्या “शत्रूंना” पाठीशी घालते तेव्हा लोकांच्या … Read more

Navneet Rana | नवनीत राणांच्या मदतीला ‘या’ बड्या नेत्यांची फौज सज्ज, स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Navneet Rana | Lok Sabha Election 2024 : युवा स्वाभिमानचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणे सुरू होणार, तत्पूर्वी त्यांनी दि. २७ मार्च रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांचे पती तसेच युवा स्वाभिमानचे … Read more

Lok Sabha Election 2024 । भाजपने चंदीगडमध्ये ‘किरण खेर’ यांना डावलले; कुणाला दिली उमेदवारी? पाहा….

Kiran Kher | Lok Sabha Election 2024 – चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील एकमेव लोकसभा मतदार संघात भाजपने तेथील दहा वर्षांच्या खासदार अभिनेत्री किरण खेर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी भाजपने संजय टंडन यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते सध्या हिमाचल प्रदेशचे भाजपचे सह-प्रभारी म्हणून काम करीत आहेत. टंडन यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणून दहा वर्ष … Read more

Lok Sabha Election 2024 : गुलाम नबी आझाद मैदानात; लोकसभा निवडणूक लढवणार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे स्वत: लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) हा पक्ष प्रथमच जनमताचा कौल आजमावणार आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रदीर्घ राजकीय वाटचाल केल्यानंतर आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्या पक्षाचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी … Read more