मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; मुलीच्या नातेवाईकांकडून वीजेच्या खांबाला बांधून मारहाण

सांगली – मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना भोगावी लागल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील शिराळा तालुक्यातील ही घटना आहे. प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना वीजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाम करण्यात आली. मारहाणीत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी १२ जणांविरोधात … Read more

जामखेडला वादळी पावसाचा जोरदार तडाखा, झाडे पडली उन्मळून; महावितरणचे नुकसान

जामखेड – वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काल शनिवारी दुपारी 4 वाजता अचानक हजेरी लावली. काही मिनिटांसाठी जोरदार सुटलेल्या वादळी वाऱ्यात रस्त्यावरील झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून वीजवाहक तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले. आरोळे नगर येथे विजेचा खांब आडवा झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्‍यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच … Read more

विजेचा खांब कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू

अकोले – अंगावर विजेचा खांब कोसळल्याने अकोले तालुक्‍यातील गणोरे येथील अलका नामदेव आंबरे (वय 55) यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. तालुक्‍यातील गणोरे परिसरातील शिंदेवाडी परिसरात शट डाऊन असल्यामुळे बाभळीचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी बाभळीच्या झाडाची फांदी शेजारी असलेल्या वीज वाहक तारांवर कोसळली. तारांवर … Read more

वीज दुरुस्ती करताना विजेच्या खांबाला चिकटून वायरमनचा मृत्यू, कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

पारनेर – तालुक्‍यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात काल (सोमवार) सायंकाळी 6 वाजता वायरमनचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्‍यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात अवकाळी वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती. त्यामुळे महावितरणने वीज दुरुस्तीसाठी वायरमन पाठवला. दरम्यान, वीज दुरुस्ती करत असताना वायरमन भरत कोल्हे यांचा विजेच्या खांबाला चिकटून … Read more

वऱ्हाडाची कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला आणि झाडाला धडकली, सहा ठार, पाच जखमी

लखनौ – मुरादाबाद येथे लग्नात सामील होण्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाची कार अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला आणि नंतर झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह पाच जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन जखमींची प्रकृती चिंताजनक … Read more

वाकडेतिकडे खांब, उघडे विद्युत बॉक्स देताहेत अपघातांना निमंत्रण

शाहूपुरीत महावितरणकडून दुर्लक्ष; नागरिकांच्या तक्रारी बेदखल सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत महावितरणचे विद्युत खांब कित्येक वर्षे वाकडेतिकडे झाले आहेत तर अनेक खांब गंजल्याने अपघातांचा धोका आहे. विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे बॉक्‍सही उघडे आहेत. याबाबत शाहूपुरीकरांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत नागरी सोयीसुविधांचा … Read more