पुणे जिल्हा | पार्टटाइम जॉबच्या आमिषाने इंजिनिअरला 11 लाखांना गंडा

वाघोली, (प्रतिनिधी)-वाघोली-लोहगाव रोड परिसरात राहणार्‍या 29 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणाला टेलिग्राम व व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करून ऑनलाइन पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून सुमारे 11 लाख 17 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या व्हॉटसअ‍ॅपवर पार्टटाइम जॉबबाबत मेसेज करून गुगल मॅप 5 स्टार रेटिंग … Read more

PUNE: शेअर ट्रेडिंगच्या नादात गमविले ३ कोटी ९६ लाख

पुणे – सोशल मीडियावर झालेली सायबर चोरट्याची ओळख एका निवृत्त इंजिनिअरला मोठी महागात पडली. या निवृत्त इंजिनिअरने शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ३ कोटी ९५ लाख ९५ हजार २०४ रुपये गमविले आहेत. याप्रकरणी संतोष जनार्दन तिवारी (वय ५९, रा. लुंकड आर्किड, विमानतळ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुपवरील … Read more

इंजिनियर मजुरी करतो, ही बाब न पटणारी; न्यायालयाचे निरीक्षण

पुणे – इंजिनिअरची पदवी असणारा पती मजुरी करतो ही बाब विश्‍वासार्ह वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पीडित पत्नीला दरमहा 12 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश पतीला दिला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला दरमहा 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो, असे गृहीत धरून कौटुंबिक न्यायालयाचे … Read more

कोयना प्रकल्पात अभियंत्यांचा दुष्काळ

विजय लाड कोयनानगर  – तांत्रिक अभियांत्रिकीचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आयएसओ मानांकनप्राप्त कोयना प्रकल्पात सध्या अभियंत्यांचा दुष्काळ जाणवत आहेत. या प्रकल्पाच्या विविध विभागांमध्ये 99 पेक्षा जादा अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. देशात दर्जाचे दुसरे नाव असलेल्या कोयना प्रकल्पाला शासनाच्या उदासीन कारभाराचा फटका बसत आहे. हे पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या राज्याला नक्कीच भूषणावह नाही. राज्यातील जनतेच्या उत्कर्षासाठी … Read more

PUNE : केशवनगर येथे उफराटा कारभार; महापालिकेने पदपथांवरच पाइपलाइन टाकून केले बांधकाम

मुंढवा – केशवनगर येथील ओढ्यावर असलेल्या नवीन पुलावरुन 18 इंची पिण्याची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, यासाठी पदपथावरच ठेकेदाराने बांधकाम केल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कोठून असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे उफराटे काम करणाऱ्या अभियंत्यावर, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. केशवनगर येथील ओढ्यावर जुना व नविन पूल शेजारी शेजारी आहेत. नविन पुलावरुन ये-जा … Read more

नगर महापालिकेत लवकरच नोकरभरती; 175 रिक्‍त जागांसाठी प्रक्रिया सुरू

नगर – महापालिकेतील तांत्रिक पदांच्या 175 रिक्त जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यातील वर्ग तीन व वर्ग चारमधील जागांची बिंदू नामावली आल्यामुळे या जागा भरण्यासाठी टाटा कन्संल्टन्सी सर्व्हिसेसकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेला 25 नवीन अभियंते, 7 डॉक्‍टर मिळणार आहेत. महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक … Read more

VIRAL : 58 लाख पगार तरीही गर्लफ्रेंड नाही, इंजिनिअर तरुणाची ‘ही’ पोस्ट वाचलीत का?

बंगळुरू – अनेक लोक आयुष्यात पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र कामामध्ये व्यस्त राहण्याच्या नादात अनेक जण आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सतत पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. यामुळे अनेक जण एकाकी पडतात. असाच प्रकार एका तरुणाच्या बाबतीत घडला आहे. चांगल्या पगाराची नोकरी असूनही गर्लफ्रेंड मिळत नसल्याची नाराजी या मुलाने व्यक्त केली आहे. बंगळुरूमधील एका … Read more

Pune Crime: कंम्प्युटर इंजिनिअरने केला इंजिनिअर पत्नीचा खून; 7 महिन्यांची चिमुकली झाली पोरकी

पुणे – संगणक अभियंता असलेली पत्नी पगाराचे पैसे देत नसल्याने तसेच चारित्र्याच्या संशयावरुन संगणक अभियंता पतीने निर्घुणपणे पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर पतीने घर मालकाच्या पायावर सात महिण्यांची मुलगी ठेऊन पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. घरमालकाने तातडीने त्या मुलीच्या माहेरी भाऊ गंगासागरला तसेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना … Read more

बारामती: महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

बारामती – महावितरण अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष माधवराव दंडवते (वय 43 रा. वर्ग दोन बिल्डिंग, फ्लॅट नंबर A6 तिसरा मजला, उर्जा भवन, कर्मचारी वसाहत) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास … Read more

गुजरातमधील भ्रष्ट सरकारी अभियंत्याकडून रेकॉर्डब्रेक रोकडजप्ती

अहमदाबाद – गुजरातमध्ये एका भ्रष्ट सरकारी अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने गैरमार्गाने कमावलेली तब्बल 2.27 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेली ती आतापर्यंतची विक्रमी रोकडजप्ती मानली जात आहे. भ्रष्ट मार्गाने प्रचंड कमाई करणाऱ्या अभियंत्याचे नाव निपूण चोक्‍सी असे आहे. तो गांधीनगरमधील समग्र शिक्षण अभियान (एसएसए) कार्यालयात रूजू … Read more