पिंपरी | स्वराज्य उभारणीत योगदान देणार्‍या सरदार वंशजांचा चिंचवड देवस्थानतर्फे सन्मान

पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वराज्य स्थापना आणि स्वराज्याच्या कारभारात ज्या घराण्यांचा महत्वाचा सहभाग होता, त्या घराण्यांच्या वंशजांचा सन्मान चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे शिवराज्याभिषेक विषयावर व्याख्यान झाले. श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर पटांगणात … Read more

पुणे | मतदार जागृतीसाठी सात हजार गटांची स्थापना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मावळ, पुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून ७ हजार १० मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापन करून सक्रीय करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांवर स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय जनजागृती … Read more

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता; ३२ जिल्हा दक्षता समित्या स्थापन

मुंबई – राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्ततेसोबतच त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते. राज्यात … Read more

Lumpy Disease : लंपी रोगविषयी शेतकरी-पशुपालकांना संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. प्रधान सचिव गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, … Read more

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई – महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार व प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य महिलापर्यंत पोहोचविण्यासाठी “शक्ती कायदा जागृती समिती” ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. शक्ती कायद्याचा … Read more

सामाजिक समांतर आरक्षणासंबधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना

मुंबई  : राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरतीसंदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितले. शासकीय नोकरभरतीमध्ये आरक्षणबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, सामाजिक आणि समांतर … Read more

Mallakhamba | मल्लखांब आशिया संघ स्थापन

पुणे – भारताचा पारंपरिक क्रीडा प्रकार असलेल्या मल्लखांबाचा आशिया संघ स्थापन झाला आहे. आशिया खंडात या खेळाचा प्रचार, प्रसार करणे तसेच विविध उपक्रम राबवून या खेळाची लोकप्रियता आणखी वाढवणे हाच हा संघ स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. आशिया संघासह या खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी जपान, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, दुबई, श्रीलंका व मालदीव या देशांच्या … Read more

Pune | शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी 17 पथकाची स्थापना

पुणे (प्रतिनिधी) : शहरातील महिला सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी पूर्वी सुरू केलेल्या बडीकॉप, पोलिस काका, पोलिस दिदी, दामिनी  योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.  त्यानुसार आणखी व्यापक स्वरूपात योजना राबवून महिलाच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी व्हिजीबल पोलिसिंगसाठी 17 पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्तालयात सोमवारी … Read more

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कॉंग्रेसची छाननी समिती स्थापन ; वर्षा गायकवाड यांचा समावेश

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने शुक्रवारी छाननी समिती स्थापन केली. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखालील त्या समितीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तरप्र देशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने इच्छूक उमेदवारांची छाननी करण्यासाठी समिती निश्‍चित केली. त्या समितीच्या सदस्यांमध्ये खासदार दिपेंदरसिंह हुडा, पक्षाचे … Read more

संरक्षण मंत्रालयाचे पाऊल ; राष्ट्रीय छात्र सेनेच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

नवी दिल्ली – राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) व्यापक आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गुरूवारी 15 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांना स्थान देण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार एनसीसी अधिक समर्पक करण्याच्या उद्देशातून स्थापण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी खासदार बैजयंत पांडा असतील. इतर सदस्यांमध्ये खासदार … Read more