प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व … Read more

येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वैद्‌यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत (एशियन डेव्हल्पमेंट बँक) वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय … Read more

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस काढणार पदयात्रा,जनतेपर्यंत पोहचून देणार ‘हा’ संदेश

मुंबई – कॉंग्रेस राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पदयात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. त्याशिवाय, राज्यघटना वाचवा, देश वाचवा असा संदेशही दिला जाणार आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पदयात्रांविषयीची माहिती दिली. खाद्यान्नावरील जीएसटी, अग्निपथ योजना या केंद्राच्या अयोग्य पाऊलांची … Read more

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान, नावीन्यता केंद्र उभारणार-उपमुख्यमंत्री पवार

बारामतीत सायन्स पार्कचे उद्‌घाटन पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करणार बारामती/ जळोची – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान आणि नाविन्यता केंद्र अत्यंत उपयुक्‍त असून प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात उभारलेल्या सायन्स ऍण्ड इनोव्हेशन ऍक्‍टिव्हिटी … Read more

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वाशिम : राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री … Read more

प्रत्येक जिल्ह्यात उभारणार महिला व बाल विकास भवन : यशोमती ठाकूर

वाशिम : महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून हे भवन उभारण्यात यावे, असे त्यांनी … Read more