CBSE Exam| सीबीएसईच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार; बोर्डाने केला खुलासा

CBSE Exam| शेतकरी आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहे. मात्र, या परिक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्‍याचा खुलासा सीबीएसई बोर्डाने केला आहे. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज म्‍हणाले, सीबीएसईच्‍या 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत होत आहेत. परीक्षा सुरळीत आणि सुरळीत पार … Read more

PUNE: दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर करडी नजर

पुणे – महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात होणारया दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. खासगी क्लासेस् बरोबर शाळा, महाविद्यालयांचे टाय्-अप असल्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत उपस्थित राहण्याएवजी खासगी क्लासेसमध्ये … Read more

इंजिनिअरिंगच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न; ‘एनएसयूआय’चे आंदोलन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील तब्बल 40 टक्के प्रश्‍न विचारले. त्यामुळे या विषयाची परीक्षा विद्यापीठाने पुन्हा घेण्याचे जाहीर केले. याविरोधात नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) शनिवारी विद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठाच्या चुकीचा फटका आम्ही का सोसावा? पुन्हा परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावे, अशी … Read more

पाचवी, आठवीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर; शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रतिक्रिया

पुणे -पाचवी आणि आठवीच्या परीक्षा घेतल्याने गुणवत्तेत भर पडणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सरसकट पास करण्याबाबतचे धोरण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून आता इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. … Read more

घोषणा करूनही प्रवेशाचे वेळापत्रक गुलदस्त्यात; सीईटी सेलच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

पुणे – राज्य सीईटी सेलमार्फत पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रत्यक्ष प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसानंतरही प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे या ढिसाळ नियोजनाचा फटका लाखो विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत आहे. मुंबई येथील राज्य सीईटी सेलच्या … Read more

कर्नाटकात परीक्षेवेळी हिजाबबंदी कायम!

बेंगळुरू – कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान एक मोठे विधान केले आहे. शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी सांगितले की, राज्य बोर्डाच्या परीक्षांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी कायम राहील. सरकार नियमांशी तडजोड करणार नाही. बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्या परिसरात हिजाब घालण्याची परवानगी आहे, परंतु त्यांना परीक्षा हॉलमध्ये हिजाब उतरवावा लागेल. शालेय शिक्षण … Read more

शंभर टक्‍के अभ्यासक्रमांवर परीक्षा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी परीक्षा 100 टक्‍के अभ्यासक्रमांवर होणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे परीक्षेची बैठक व्यवस्था राहील. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकत आहेत, त्याच महाविद्यालयात परीक्षा होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जवळपास … Read more

यंदाच्या परीक्षा “एमसीक्‍यू’ऐवजी ऑफलाइन व प्रचलित पद्धतीनेच होणार

लेखी परीक्षेसाठी मिळणार अतिरिक्‍त वेळ दोन पेपरमध्ये दोन दिवसांचे अंतर प्रश्‍नसंचही विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार पुणे – विद्यापीठाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. त्यानंतर त्वरित विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करीत विद्यापीठाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले. या लेखी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे 15 मिनिटांचा … Read more

‘जेईई मेन’ पहिल्या सत्राची परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

पुणे –देशभरातील ‘आयआयटीसी’ नामांकित केंद्रीय शिक्षण अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी “जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रांत होणार असून पहिल्या सत्रातील परीक्षा जूनमध्ये, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. देशभरातील विविध राज्यात बारावीची परीक्षा घेणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने होत आहेत. त्यामुळे … Read more

पुणे : ‘विनर’ कंपनीमार्फतच होणार परीक्षा

पुणे –महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्व “ओएमएस’ बेस परीक्षांची कामे “विनर’ सॉफ्टवेअर प्रा.लि. कंपनीमार्फतच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्‍कामोर्तब झाले आहे. यामुळे आता विविध प्रलंबित परीक्षा घेण्यातील तिढा सुटला असून परीक्षा जूनमध्येच घेण्यात येणार आहेत. विविध परीक्षा घेण्याबाबतची जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात “विनर’ सॉफ्टवेअर कंपनीला टीईटी, … Read more