satara | जिल्हा क्रीडा संकुलाची जलतरण सेवा महागली

सातारा, (प्रतिनिधी) – येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे शुल्क वाढवण्यात आल्याने जलतरणपटू मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . सातारकरांना प्रतिव्यक्ती 2200 रुपये मोजण्याची वेळ आल्यामुळे बाळगोपाळांना पालिकेच्या भवानी तलावाची आठवण येत आहे. जलतरण तलावाच्या सुविधा साधारण दर्जाच्या असताना ठेका तत्त्वावर दिलेला जलतरण तलाव सध्या वादावादीचे केंद्र बनला आहे. छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील क्रीडा … Read more

मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे, कचरा टाकणे पडणार महागात..

मुंबई – मुंबईतील रस्त्यावर थुंकणाऱ्या अथवा कचरा टाकणाऱ्यांना आता आर्थिक दंडाला सामोरे जावले लागणार आहे. महापालिकेने अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. हे मार्शल्स रस्त्यांवर थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड ठोठावणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक पालिका वॉर्डात आता 30 क्लीनअप मार्शल तैनात करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर मंगळवारपासून त्याची सुरूवात … Read more

सातारा – पितृ पंधरवड्यामुळे भाज्या महागल्या

सातारा – येथील सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन दिवसात 55 ट्रक भाज्यांची आवक झाली. पितृपंधरवड्यामुळे बहुतांश भाजीपाल्याची मागणी वाढली असून त्या तुलनेत आवक घटली आहे. त्यामुळे दरात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. परिणामी भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, फ्लावर, शेवगा, घेवडा,मटार या भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. गुजरात, … Read more

Gold Silver Price : इस्राइल पॅलेस्टाईन युद्धाचा भारतावर परिणाम; सोने पुन्हा झाले महाग, वाचा आजचे दर

Gold Silver Price : इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा दल हमासला चोख प्रत्युत्तर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु झालेल्या या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसत असल्याचे दिसत आहे.  कारण  आणि इस्राइल -हमास यांच्यातील संघर्षामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. देशात आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. त्यातच आज … Read more

मोबाईलवर ‘अशा’ प्रकारचा व्हिडिओ पाहणे पडेल महागात ; क्षणार्धात संपेल सर्व काही

नवी दिल्ली : भारतात अॅडल्ट कंटेंटवर बंदी आहे, पण असे असतानाही अनेक लोक असे कंटेंट गुपचूप पाहतात. भारत सरकारच्या आदेशानुसार, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या नेटवर्कवर पॉर्न, चाइल्ड पॉर्न आणि इतर अश्लील सामग्रीवर बंदी घातली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, भारत सरकारच्या कायद्यानुसार, देशात पॉर्न बनवणे, ते कोणत्याही साइटवर अपलोड करणे किंवा इतर कोणत्याही … Read more

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डुलक्या घेणे पडले महागात; व्हिडीओ व्हायरल होताच तासाभरात मुख्य अधिकारी निलंबित

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यक्रमात डुलकी घेणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. कार्यक्रमादरम्यान झोप घेतल्याबद्दल भुज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण विभागाचे उपसचिव मनीष शहा यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला आहे. गुजरात नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७१ … Read more

चीनमध्ये महागड्या विवाह समारंभांवर बंदी

बीजिंग –  गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधील जनन दर झपाट्याने घटला असल्याने लोकसंख्या वाढीसाठी चीन सरकारकडून सतत नवनवीन उपायांची योजना केली जात आहे याच उपायांचा एक भाग म्हणून आता चीनमध्ये महागड्या विवाहासमारंभांवर बंदी घालण्यात आली आहे चीनमधील पारंपारिक विवाह समारंभाचा भाग असलेली ब्राईड प्राईस ही हुंडा सदृश परंपराही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन सरकारने … Read more

एलपीजी सिलिंडर झाला महाग, आजपासून होत आहेत ‘हे’ 6 बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम

मुंबई  – आजपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले असून पहिल्याच दिवसापासून सर्वसामान्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. असे अनेक बदल आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आरोग्यावर होईल. बँकिंगशी संबंधित नियमांपासून ते एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या आजपासून कोणते मोठे बदल होत आहेत. एलपीजीच्या दरात बदल गॅस कंपन्या दर महिन्याच्या … Read more

सावधान… न्यू इयर सेलिब्रेशन पडू शकते महागात; नियम मोडल्यास होऊ शकतो ‘गुन्हा दाखल’

मुंबई – अजून काही तास… जग नवीन वर्षाची वाट पाहणार. काहीजण आपल्या कुटुंबासह तर काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतील. मात्र नवीन वर्ष साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुरुंगात जावे लागू शकते. नवीन वर्षात कोणतीही दुर्घटना किंवा दुर्घटना घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत. 31 डिसेंबर रोजी दिल्लीत 16,500 हून अधिक पोलीस तैनात … Read more

पालेभाज्या अजूनही महागच

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर, कांदापात, करडई, राजगिऱ्याच्या भावात वाढ झाली. मेथी आणि शेपूच्या भावात मात्र घट झाली आहे. तर चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे आणि चुक्‍याचे भाव स्थिर आहेत. पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. आवक घटल्याने भावात वाढ झाली असून रविवारी मार्केटयार्डात कोथींबीर 90 हजार … Read more