मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा; सराफाकडे 5 कोटी मागितल्याचा आरोप

Avinash Jadhav | Extortion case – मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ … Read more

अपहरण आणि खंडणी प्रकरण : सांगली येथील टोळी मधील एकास जामीन मंजुर

पुणे : जून्या पैशाच्या वादातुन धायरी येथील तरुणाचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण करुन सांगली तासगाव येथे एका शेड मध्ये कोंडुन मारहान करुन फ़ोन द्वारे खंडणी मागीतली. या प्रकरणी अमोल उत्तम मोरे (रा.बिरनवाडी , सांगली ) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे साहेब यांनी जामीन मंजुर केला आहे. दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तमनगर पोलीस … Read more

परमबीर सिंह यांना क्लीन चिट ! खंडणी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

नवी दिल्‍ली – माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सीबीआयकडून क्लीन चीट देण्‍यात आली आहे. राष्‍ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन खळबळ माजवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल … Read more

खंडणीप्रकरणी 15 संशयित जेरबंद

सातारा – हॉटेल व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून, तब्बल 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दरोडा टाकणारी 15 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी जेरबंद केली आहे. अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे, अभिजित शिवाजी मोरे (दोघे रा. गंगापुरी, वाई), अरिफ सिकंदर मुल्ला (वय 43), सागर तुकाराम मोरे (वय … Read more

मुंबईत दाखल होताच परमबीर सिंह चौकशीच्या जाळ्यात; सीआयडीने बजावले २ समन्स

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असणारे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता सीआयडी  चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीआयडीकडून दोन गुन्ह्यात … Read more

Extortion Case: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाजेच्या पोलीस कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ

मुंबई – खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाजे याला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाजे याला यापूर्वी 6 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज ती कोठडी संपली. वाजे यांना पुन्हा एकदा 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसुली प्रकरणात मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने सचिन वाजेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली … Read more

Extortion case : परमबीर सिंह यांच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याकारणाने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. Extortion case | Look Out Circular issued against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file photo): Thane … Read more

Breaking : परमबीर सिंहांनी दोन कोटी स्वीकारले; ‘या’ ६ जणांसह दुसरा गुन्हा दाखल, जाणून घ्या नावे

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज पुन्हा 2 कोटी रूपयांची मागणी केल्याच्या आरोपाखाली परमबीर सिंह यांच्यासह इतर 6 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra: Second case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir … Read more

मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. A case of … Read more