बिल्डरला खंडणी मागितलेले प्रकरण : अमोल चव्हाण याला अटक

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करुण देण्याची मागणी केल्याप्रकरणात अमोल सतिश चव्हाण (कोथरुड) याला पोलिसांनी अटक केली. त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात एका महिलेसह बडतर्फ पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ … Read more

चंद्रकांत पाटील यांच्या नावाने रुग्णालयाकडे 25 लाखांची खंडणी; एकास अटक

पैसे घ्यायला आला अन्‌ अडकला : चंद्रकांत पाटील यांच्या तोतया स्वीय सहायकास अटक पिंपरी – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयाकडे 25 लाखांची खंडणी मागितली. मात्र निगडी पोलिसांनी आरोपीला पैशाचे आमिष दाखवून बोलविले. पोलिसांनी विणलेल्या जाळ्यात एक आरोपी अलगद अडकला. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. पुण्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. सौरभ … Read more

‘सिंहगड’च्या संचालकांकडून 40 लाखांची खंडणी

रवींद्र बऱ्हाटे याच्यावर आणखी एक गुन्हा पुणे – सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीचे संचालक मारुती नवले यांना धमकावून 40 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि साथीदार सिद्धार्थ डांगी याच्यावर डेक्‍कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड संस्थेचे संचालक मारुती निवृत्ती नवले (वय 71, रा. … Read more

बऱ्हाटे, जैन आणि जगताप टोळीवर आणखी एक गुन्हा

बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत 1 कोटी 88 लाखांची मागणी पुणे – बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्यानंतर त्याला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केल्याच्या आरोपावरून स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि निलंबित पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यातील जैन, जगताप यांना समर्थ पोलिसांनी अटक केली … Read more

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ता, निलंबित पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा पुणे – शहरातील व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी व काही कोटी रुपयांची जागा नावावर करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता, ज्येष्ठ पत्रकार, निलंबित पोलीस कर्मचारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

‘छोटा राजन व माझा डीएनए एकच’

गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीने मागितली पन्नास लाखाची खंडणी पुणे – कौटुंबिक वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी गॅंगस्टार छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे आणि तीच्या दोन साथीदारांनी संगनमत करून शहरातील एका व्यक्तीकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिने संबंधित व्यक्तीवर पिस्तूल रोखत दहाच्या दहा गोळ्या घालण्याची धमकी दिली. इतकेच नव्हेतर छोटा राजन व माझा … Read more

“माथाडी’च्या नावाखाली व्यावसायिकाकडे खंडणी

गजानन मारणे टोळीतील सराईतासह चौघे जेरबंद पुणे – हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी गजानन मारणे याच्या टोळीतील सराईतासह चौघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. सव्वादोन महिणे हे आरोपी हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होते. मागील वर्षभरात माथाडी संघटनेच्या नावाने खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणाची पोलीस आयुक्‍तांनी गांभीर्याने … Read more

बिचुकलेच्या अडचणीत वाढ; 2012 सालच्या खंडणी प्रकरणाची सुनावणी बाकी

सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी कालपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला त्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे. 2012 साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणाची आता सुनावणी सुरू आहे त्यामुळे अभिजित बिचुकलेच्या बाहेर येण्याच्या मार्गात तूर्तास तरी अडथळेच दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणी सुट्टीकालीन न्यायाधीश आर. व्ही. पाटील … Read more