पुणे जिल्हा | रक्त, अन्न, नेत्रदान हेच खरे जीवनदान अभयदान

आळंदी (वार्ताहर) – जीवनात सन्मार्गांनी कमावलेले धन-संपत्ती ही अन्नदानासारख्या समाज उपयोगी उपक्रमात वापरली तर ती कधीही नाश पावत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढच होत असते. रक्तदान हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणारे ठरते व मरणोत्तर केलेले नेत्रदान एखाद्याच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देणारे ठरते व पर्यायाने दानात सर्वात मोठे असलेले अभयदान होते, असे प्रतिपादन प्रशांत ऋषीजी … Read more

Diwali : दिवाळीत फटाके फोडताना ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी ! वाचा….

Diwali :  दिव्यांचा आणि आनंदाचा सण दिवाळीसाठी देशभरात उत्साह आहे. हा सण अनेक बाबतीत विशेष आहे. मिठाई आणि स्वादिष्ट अन्नासह फटाके हे खूप खास बनवतात. पण नेहमी लक्षात ठेवा, या काळात थोडासा निष्काळजीपणाही तुमच्या आरोग्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्याचा धोका आणि मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो, म्हणूनच प्रत्येकाने आपल्या … Read more

राज्यात साडेपाच लाख जणांना डोळ्यांचा संसर्ग; बाधितांच्या संख्येत पुणे जिल्हा अव्वल

पुणे – डोळे येण्याच्या साथीत राज्यात साडेपाच लाख जणांना संसर्ग झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्हा अव्वल असून, 52 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात डोळे येण्याची साथ ओसरली आहे. यामध्ये पुण्यापाठोपाठ बुलढाणा – 50 हजार, जळगाव – 29 हजार, चंद्रपूर – 27 हजार आणि अमरावती – 23 हजार असे पाच … Read more

Nashik: ‘लेझर लाइट’मुळे 6 जणांवर डोळे गमावण्याची वेळ?

नाशिक – गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, केवळ आवाजामुळेच नव्हे तर लेझर लाइटच्या झगमगाटामुळे तब्बल सहा जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याचेही समोर आले आहे. लेझरच्या लाइटमुळे डोळ्यांवरच थेट परिणाम होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे- लेझर लाइटमुळे सहा जणांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली … Read more

Amruta Fadnavis : “ट्रॅकसूट…हातमोजे अन् डोळ्यांवर गॉगल..”; अमृता फडणवीसांनी राबवली जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम

Amruta Fadnavis : मुंबईत काल अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील मूर्ती आणि घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. त्यात निर्माल्य, इतर प्रकारचा कचरा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा झाल्या होत्या. तेच निर्माल्य स्वच्छ करण्याचे काम अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले. दरम्यान, चौपाटीवर … Read more

PUNE: डोळे येण्याची साथ ओसरतेय! शहरात 13 हजारांपैकी दहा हजार बरे

पुणे – शहरासह जिल्ह्यातील डोळ्यांची साथ आता हळूहळू ओसरत असून, जिल्ह्यात 70 हजारांपैकी 52 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर पुणे शहरात 13 हजारांपैकी 10 हजार रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, डोळे आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये आणि नागरिकांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शहर परिसरात डोळ्यांची साथ लवकरच … Read more

PUNE : संसर्गाने डोळे लाल…; जिल्ह्यात आढळले 16,105 रुग्ण

पुणे – राज्यात “डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ नोंदवली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 851 या आजाराचे बाधित आढळले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 16, 105 रुग्ण सापडले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये 4,445 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऍडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो. हा सौम्य संसर्ग असला, तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात … Read more

आंबेगावातही डोळ्यांच्या साथीचा शिरकाव ; काळजी घेण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

रांजणी – डेंग्यू सदृश्‍य साथीच्या आजाराचे संकट कायम असताना आता आंबेगाव तालुक्‍यात संसर्गजन्य डोळ्यांच्या आजाराची साथ आली आहे. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः प्रथम एकाच डोळ्याला होता; मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होत आहे. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन … Read more

दूध दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक – प्रभाकर बांगर

मंचर येथे दूध उत्पादकांचा मोर्चा मंचर – शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणाऱ्या राज्य सरकारने दिलेली दूध दरवाढ फसवी असून, दूध उत्पादकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली. सरकारने देऊ केलेल्या दूधदरासंदर्भात फसव्या घोषणेबाबत लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवार (दि. … Read more

विषाणूजन्य संसर्गाने डोळे येण्याची साथ; आरोग्य विभागाचा अलर्ट

पुणे – डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, काळजी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. याशिवाय उपाययोजना करण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य विभागाने आदेशही काढले आहेत. राज्यातील अनेक भागात उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू झाली आहे. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे … Read more