नेवासा: शासनाने जमीन दिली, पण शेतात जायला रस्ताच नाही; तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे लक्षवेधी उपोषण

नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर आणि मुरमे येथील रहवासी असलेल्या लाभार्थ्यांना उस्थळ दुमाला (ता.नेवासा) येथे शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतंर्गत विशेष समाज कल्याण विभागाकडून शासनाच्या 50 टक्के अनुदानावर जमीनी दिलेल्या आहेत. मात्र या जमीनीची मशागत करण्यासाठी या लाभार्थ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसून पाटपाण्यासाठी असलेल्या चारीचे पाणीही दुसरीकडेच अडविले जात आहे. यामुळे या लाभार्थ्यांना शासनाने … Read more

आता शेतात सीसीटीव्ही लावायचे का?

पुसेगाव  -खटाव तालुक्‍यात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गादेवाडी (ता. खटाव) येथील शेतकरी जनार्दन हणमंत साळुंखे यांच्या शेतातील 50 हजार रुपये किंमतीचे आले रात्रीच्या वेळेस चोरीला गेल्याने साळुंखे यांना मोठा फटका बसला. या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. गेल्या … Read more

“शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, हेलिकॉप्टर खरेदीसाठी शासकीय अनुदान द्या”; शेतकरी महिलेची तहसिलदारांकडे विनंती

निमोणे :  गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा आदेश … Read more

उद्धव ठाकरे यांना शेताचा बांध तरी माहिती का? – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

पुणे – उद्धव ठाकरे यांना शेताचा बांधच माहिती नाही. त्यांना माहित असता बांध फुटला असता का? 40 आमदार व 13 खासदार वाहून गेले असते का, बांध माहिती असता तर ठाकरे यांची अशी अवस्था झाली नसती, अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. पुणे येथे कृषीमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्याचे कृषीमंत्री शेताच्या बांधावर जात … Read more

अमेठी : मुस्लिमांच्या शेतात सापडले शिवलिंग, पूजा करणाऱ्यांची गर्दी

अमेठी – अमेठी जिल्ह्यातील जैस भागात असलेल्या एका शेतात शिवलिंग सापडले असून हजारोंचा जमाव घटनास्थळी पोहोचला आहे. हे शेत एका मुस्लिम व्यक्तीचे असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुस्लिमांच्या शेतात शिवलिंग बाहेर पडल्याची माहिती मिळताच एसडीएम आणि सीओ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने प्रशासकीय कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी शिवलिंग उचलून जवळच्या शिवमंदिरात ठेवले. हे संपूर्ण प्रकरण रायबरेली … Read more

शेतीपासून ऊर्जा निर्मिती वाढविण्याची गरज – नितीन गडकरी

मुंबई – भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आता अन्नधान्याच्या ऐवजी ऊर्जा निर्मितीकडे भर देण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये ऊर्जेचा तुटवडा आहे. तो तुटवडा भरून करण्यासाठी शेतीची मदत घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. मुंबईचा कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केल्या नंतर बोलताना … Read more

विभागीय आधिकारी, जिल्हाधिकारी आयुक्त थेट बांधावर

राजगुरूनगर – ई-पीक ही राज्य सरकाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतपीक 7/12वर अपडेट करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत फायद्याचा आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. वेताळे (ता. खेड) येथे महसूल विभागासह कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावतीने ऑनलाइन 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंदणी ई-पीक ऍपच्या प्रणाली माध्यमातून नोंदणी पद्धतीचा आढावा विभागीय … Read more

धक्कादायक ! पुण्यात बाजरीच्या शेतात दगडाने ठेचून खून

पुणे – बाजरीच्या शेतामध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना लोणीकंद येथील आव्हळवाडी येथे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी उमेश आव्हाळे (39) हे गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांना गावातील राजेश घुले यांच्या बाजरीच्या शेतात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पडल्याची … Read more

२० इंच उंचीची जगातील सर्वात लहान गाय

ढाका –  बांगलादेशात सध्या एका गायीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे . कारण ही गाय जगातली सर्वांत चिमुकली गाय आहे . या गायीचं नाव राणी असून भुत्ती जातीची किंवा भुतानची ही 23 महिन्यांची गाय अवघी 51 सेंटिमीटर म्हणजे 20 इंच उंच आहे.या गायीचे वजन 28 किलो आहे बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक असलेल्या छारीग्रामजवळ एका … Read more

स्पेसेक्‍सचे रॉकेट उतरले चक्क एका शेतात

सॅन फ्रान्सिस्को – स्पेसेक्‍स फाल्कन कंपनीचे अंतराळ यान आज एका शेतात उतरले. त्यामुळे या शेतीचा मालक आश्‍चर्यचकीत झालाच. पण त्याला या गोष्टीचा प्रचंड धक्‍काही बसला. रॉकेट अचानक शेतात उतरल्यामुळे वॉशिंग्टन प्रांतातील या जमिनीला चार फुटांचा खोल खड्डा पडला आहे. सामान्यतः बहुतेक वेळा दुसऱ्या टप्प्यात रॉकेटचा भाग वर्षानुवर्षे अंतराळ कक्षामध्ये फिरत असतात किंवा पृथ्वीवर येण्याच्या प्रयत्नात … Read more