भाजपच्या उमेदवाराने खासदार निधीतून बांधले आलिशान घर आणि फार्म हाऊस; काँग्रेस नेत्याचा आरोप

BJP candidate | Lok Sabha Election 2024 : कोणत्याही खासदाराला प्रतीवर्षी दिला जाणारा निधी हा त्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी असतो. मात्र, मध्य प्रदेशातील धार मतदारसंघाच्या प्रतिनिधी भाजपाच्या सावित्री ठाकूर यांनी खासदार निधीचा वापर करुन स्वत:चे दोन मजली आलिशान घर आणि एक फार्म हाऊस बांधले. शिवाय ही बाब प्रतिज्ञापत्रात लपवल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार … Read more

कर चुकवणाऱ्या बड्या धेंडांची आयकर, “ईडी’कडून चौकशी व्हावी

सातारा  -जागतिक वारसा स्थळ दर्जा लाभलेल्या कास पठारावरील संवेदनशील क्षेत्रात बेकायदेशीर फार्म हाऊस उभारणाऱ्या धनदांडग्या मिळकतधारकांची आयकर विभाग आणि प्रवर्तन संचालनालय विभागामार्फत चौकशी व्हावी अशी तक्रार दिशा विकास मंच अध्यक्ष सुशांत मोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. ही चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रवर्तन संचालनालयाकडे पाठवलेल्या निवेदनात नमूद … Read more

Pune : हॉटेल्स, फार्म हाऊसचा कचरा थेट ओढ्यात

खडकवासला –डोणजे येथे पथदर्शी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला कचरा देण्याऐवजी हॉटेल्स, फार्म हाऊस, वृद्धाश्रम आणि वेलनेस सेंटर्सचा कचरा आणि सांडपाणी हे ओढ्यात सोडण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचातीने आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल आणि संस्थांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. करण्यात आली आहे. डोणजे परिसरात दीडशेच्या वर हॉटेल फार्म हाऊस वृद्धाश्रम … Read more

मुळशीत फार्महाऊसवर पोलिसांचा कडा पहारा

अजित पवार व परिवाराशी संबंधित दोन फार्महाऊस पिरंगुट – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या मुळशी तालुक्‍यातील दोन फार्म हाऊसवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवार (दि. 23)च्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी पार पडल्यामुळे हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या राज्याच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होत असल्याचे … Read more