अजिंक्यतारा हा शेतकऱ्यांची काळजी घेणारा एकमेव कारखाना

सातारा – स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखान्याची उभारणी करून सातारा व आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणले. आज या कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. यामागे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा हाच एकमेव उद्देश आहे. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने … Read more

पिंपरी | मावळातील शेतकऱयांना प्रतीक्षा पावसाची

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय करतात. त्यांच्यासाठी लागणाऱया चाऱयाचे डोंगरदऱ्यातील क्षेत्र कमी होत असून जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून … Read more

शेतकऱ्याकडून लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक

लातूर  – बळीराजाला देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड … Read more

पुणे | मान्सून दाखल; राज्यात पुढील आठवडाभर जोरदार पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून गुरूवारी (दि. 6) महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि सोलापूरचा भाग व्यापला आहे. त्यामुळे या भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई, पुण्यासह मान्सून अन्य भाग व्यापेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या बहुतांशी भागात पाणीटंचाई … Read more

पुणे जिल्हा | वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा

भवानीनगर, (वार्ताहर) – वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा, मदत करा, केकऐवजी कलिंगड कापा, खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाला बाजार मिळेल व शेतकरी आत्महत्या रोखायला मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस साजरे होत असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत … Read more

अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या

पुणे – नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि शेतात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्यास बसला आहे. बऱ्याच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. तर, काही भाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. सध्या, लसणाने घाऊक बाजारात १६० रुपयांचा आकडा पार केला आहे. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये पावकिलो भावाने विक्री होत आहे. अवकाळी पावसचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी … Read more

पुणे जिल्हा | अवकाळीमुळे वातावरणात बदल; शेतकऱ्यांचे झाले नुकसान

सोरतापवाडी, (वार्ताहर)- अवकाळी पावसाने पूर्व हवेलीत वातावरणात बदल झाला असून शेतकरी मात्र हवादिल झाला आहे. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी काचंन, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, वळती, तरडे, शिंदवणे, टिळेकरवाडी, भवरापूर, आदी गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व पिके नष्ट होतील या … Read more

निवडणुक काळात तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या; आकडा पाहून बसेल धक्का !

farmer Suicide । election – लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या काळात फक्त एप्रिल महिन्यात मराठवाड्यामध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. फक्त बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच समस्या नाही, पाणीटंचाईचीही गंभीर समस्या आहे. एकीकडे पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली … Read more

नेवासा: शासनाने जमीन दिली, पण शेतात जायला रस्ताच नाही; तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे लक्षवेधी उपोषण

नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर आणि मुरमे येथील रहवासी असलेल्या लाभार्थ्यांना उस्थळ दुमाला (ता.नेवासा) येथे शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतंर्गत विशेष समाज कल्याण विभागाकडून शासनाच्या 50 टक्के अनुदानावर जमीनी दिलेल्या आहेत. मात्र या जमीनीची मशागत करण्यासाठी या लाभार्थ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसून पाटपाण्यासाठी असलेल्या चारीचे पाणीही दुसरीकडेच अडविले जात आहे. यामुळे या लाभार्थ्यांना शासनाने … Read more

भाजपला करावा लागतोय शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना; पंजाब आणि हरियाणात होतोय प्रचंड विरोध

चंदीगढ – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंजाब आणि हरियाणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागतो आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी टीका केली आहे. केवळ भाजपच्या विरोधात निदर्शने का केली जात आहेत, आम आदमी पार्टी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा विरोध का केला जात नाही असा प्रश्‍न जाखड यांनी विचारला … Read more