पुणे जिल्हा | वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा

भवानीनगर, (वार्ताहर) – वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा, मदत करा, केकऐवजी कलिंगड कापा, खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाला बाजार मिळेल व शेतकरी आत्महत्या रोखायला मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस साजरे होत असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत … Read more

पुणे जिल्हा | शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा

मंचर, (प्रतिनिधी) – नागापूर (ता.आंबेगाव) येथे शेतकऱ्याच्या आत्महत्येस दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन माकपच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयात देण्यात आले. नागापूर येथे शेतमजुरी करणाऱ्या एका आदिवासी कुटुंबातील एकनाथ बर्डे या व्यक्तीस शेतमालकाने अपमानास्पद वागणूक देवून व मारहाण केल्यामुळे एकनाथ बर्डे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. ही घटना अत्यंत … Read more

पुणे | ज्वलंत प्रश्‍नांवर मोदी काहीच बोलत नाहीत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्‍यातील पाणीटंचाई, शेतकरी आत्‍महत्‍या यासारख्या ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्‍यामुळे नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर केली. लोकसभा … Read more

“चुकीच्या धोरणांमुळे राज्‍यात शेतकरी आत्महत्या”

मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही जोरदार गाजला. दरम्यान आज मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत आश्वासनाच्या वाफा सोडणाऱ्या ट्रीपल इंजिन सरकारच शेतकरी आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर … Read more

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वस्तुस्थितीचे अवलोकन करा : आमदार शशिकांत शिंदे

कोरेगाव – राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, आर्थिक आरिष्टामुळे तो आत्महत्या करत आहे. राज्य सरकार वेगवेगळी धोरणे जाहीर करत आहे, पन्नास हजार रुपये कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र अद्याप ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने वस्तुस्थितीचे अवलोकन करावे आणि निश्‍चित धोरण ठरवावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे … Read more

“शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही…’; जयंत पाटील यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई – राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. कितीही प्रयत्न केले तरी आताच्या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा “कलंक’ पुसता येणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान पाटील पुढे … Read more

धक्कादायक! मुलाला डाॅक्टर बनवायचं होतं; विनवण्या करुनही बॅंकेने कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने जीवन संपवले

कोल्हापूर – मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बॅंकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बॅंकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न … Read more

कर्जबाराजीपणामुळे हिंगोलीतील शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोली – मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि गाडीसाठी घेतलेलं कर्ज कसे … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

हिंगोली – सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  खंडूजी अश्रुबा खुडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विहिरीमध्ये उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. बोरी पोलिस स्टेशनांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व बोरी येथील सरकारी … Read more

जालन्यात शेतकरी पती-पत्नीने संपवले जीवन, परिसरात हळहळ

जालना – शेतकरी पती-पत्नीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात घडली. संजय ढेबे (वय45) आणि संगीता ढेबे (वय40) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. राहत्या घरी गळफास लावून त्यांनी आत्मह त्या केली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ढेबे दाम्पत्याची परिस्थिती अत्यंत हालाखिची होती. काबाड कष्ट करून … Read more