भानगडी बाहेर काढल्या तर तोंड दाखवणे अवघड होईल

सातारा – जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आमचा मोठा वाटा आहे. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या सहकार्यामुळे ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी राहिली. या सहकार्याची जाणीव न ठेवता आमच्यावर बेछूट आरोप करू नयेत. आम्ही आपल्या भानगडी बाहेर काढल्या तर सार्वजनिक जीवनात तुम्हाला तोंड दाखवणे अवघड होईल, असा इशारा जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी प्रतापगड … Read more

नगर | पावसाची प्रतीक्षा ; शेती मशागतीच्या कामांना आला वेग

नगर – गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामानाने पिकांची वाताहात झाली. त्यातच गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. पिकांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. आता पुन्हा बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला असून पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असल्याचे दिसत आहे. दोन वर्ष पदरी निराशा पडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, तरीदेखील खरीप हंगामातील पिकांसाठी … Read more

पुणे जिल्हा | मुखईत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

शिक्रापूर, (वार्ताहर)- मुखई (ता. शिरुर) येथील नाथू पुजारी यांच्या शेतातील पाण्याचे मोटारचे स्टार्टर बंद पडल्याने सतीश धुमाळ हे स्टार्टर दुरुस्त करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते बाजूला पडले. दरम्यान ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सतीश नानासो धुमाळ (वय 40, रा. मुखई) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत रमेश … Read more

पुणे जिल्हा | भात खाचरात फुलविला सूर्यफुलाचा मळा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रामुख्याने भात शेती केली जाते. नंतर उन्हाळी कोणतीही पीक घेतले जात नाही. परंतु वाठार (ता.भोर) येथील प्रगतशील शेतकरी भरत राघु खाटपे यांनी आधुनिकतेची कास धरून व्यापारी तत्त्वावर शेती करणे अवलंबले यासाठी त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये दोन जानेवारी २०२४ ला सूर्यफुलाची टोकन पद्धतीने लागवड … Read more

पुणे | कलिंगडांचा हंगाम बहरला- ८० ते १०० टनांची आवक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- उन्हाळ्याची चाहूल लागताच लालबुंद कलिंगडांची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात वाढली आहे. तापमान वाढेल तसा कलिंगडांचा हंगाम बहरत चालला आहे. बाजारात कलिंगडांची दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. ही आवक मागील १५ दिवसाच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे. भावातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे मागणी आहे. तसेच, मुस्लीम … Read more

Success Story । नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती… आज करतोय लाखोंची उलाढाल, अनेकांना देतोय मोठा रोजगार

mushroom farming । एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक अडचणी दूर होतात. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील ‘बलविंद्र सिंह’ या शेतकऱ्याने असेच काहीसे केले आहे, ज्याने आपली खाजगी नोकरी सोडून ‘मशरूम’ची शेती सुरू केली, ज्यामुळे त्याला इतका नफा झाला की तो आता अनेकांना रोजगार देत आहे. या प्रगतीशील शेतकऱ्याने आपली खाजगी नोकरी सोडून मशरूमची शेती सुरू … Read more

पुणे | अफू लागवडप्रकरणी दोघांना अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली. अफूची विनापरवाना शेती केल्याप्रकरणी किरण कुंडलिक जगताप (४०) आणि रोहिदास चांगदेव जगताप (५५, दोघे … Read more

पुणे | डमी आडत्याकडून शेतकऱ्यास मारहाण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डातील फळ विभागात शेतकर्‍याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. डमी आडत्या (चवली दलाल) मोसंबीला कमी भाव देतो, हे सांगितल्याने शेतकर्‍याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांनी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी पाठवायचा का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांनी शुक्रवारी एका आडत्याकडे … Read more

सातारा | कोयना धरणातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयनानगर, (वार्ताहर) – राज्यात सगळीकडे उन्हाळा सुरू झाला असून, पिकांना फटका बसत आहे. कृष्णा नदीचे पात्र ठिकठिकाणी कोरडे असल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या पूर्वेकडील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके करपून जाऊ नयेत यासाठी त्यांनी पूर्वेकडील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार धरणाच्या पायथा वीजगृहाबरोबर … Read more

पुणे | रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले

पुणे, {प्रभात वृत्तसेवाञ} – राज्याचे रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 96 हजार 969 हेक्टरइतके असून प्रत्यक्षात 58 लाख 60 हजार 169 हेक्टर (108.58 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीचे क्षेत्र गतवर्षापेक्षा 3 लाख 20 हजार हेक्टरने वाढले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कृषी … Read more