nagar | शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा गाळात रुतून मृत्यू

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील काष्टी शिवारातील पुनर्वसन परिसरातील रेल्वेलाईनच्या शेजारी खोदलेल्या शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता.श्रीगोंदा) हा शेततळ्यातील चिखलात रुतुन मयत झाला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले पण हे ठिकाण शेतकऱ्याने अनधिकृतपणे येथील मुरुम रेल्वेलाईनच्या कडेने टाकायला … Read more

महिलेसह दोन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

कराड – पाडळी (हेळगाव, ता. कराड) येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. आज मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात दोरीच्या सहाय्याने पोहताना दोरी तुटून ही दुर्घटना घडली. यामध्ये पोहायला येत असणाऱ्यांनी बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सहा जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु, एका महिलेसह दोन मुलींचा बुडून … Read more

वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार – महसूल मंत्री थोरात

मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत सांगितले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, प्रकाश सोळंके, यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री थोरात म्हणाले की, जून आणि जुलै … Read more

ओल्या दुःखावर पंचनाम्याचे मलम

सरसकट हेक्‍टरी मदत जाहीर करा : आर्थिक गाळातील बळीराजाला बाहेर काढा ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य व केंद्र सरकारने घ्यावा सकारात्मक निर्णय – राहुल गणगे पुणे – सलग झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे; मात्र अनेक भागांतील पिके अजूनही पाण्याखालीच आहेत. फळबागा, भाजीपाला, तसेच … Read more

आवक कमी, भाव जास्त : सततच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान

काढणी होत नसल्याने आवक घटली : मागणी जास्त भावात मात्र वाढ  पुणे – राज्यात पावसाच्या माऱ्याने भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या हलक्‍या प्रतीच्या आहेत. मात्र, त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे गड्डीचे भाव वाढल्याची माहिती विक्रेते धनजंय माने यांनी दिली.  मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्हा, विभागासह परराज्यातून भाज्यांची … Read more

पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात ढगफुटी सदृश्य पाऊस

जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने उभी पिकं भुईसपाट नीरा – पुरंदर तालुक्यातील कायम दुष्काळी भागात म्हणून ओळख असलेल्या दक्षिण पूर्व पट्ट्यात काल रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेलया बजारिसह उभा ऊस भुईसपाट झाला आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने काढणीला आलेली बाजरी आता पाण्यात लोळत आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे ढगफुटी … Read more

पावसाअभावी भातलावणी रखडली

बळीराजाच्या मनात चिंतेचे ढग : बहुसंख्य शेतकऱ्यांकडे नाही सिंचनाची सोय पवनानगर – निसर्ग चक्रीवादळामुळे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला. त्यामुळे मावळासह महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी पावसाळा लवकर आल्याने मोठा आनंदी होता. परंतु वादळ गेले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून पावसदेखील हद्दपार झाला. त्यामुळे मावळात भातलावणी रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पवनमावळसह मावळतालुक्‍यात … Read more

Life With Corona : खरिपातील अन्नसाखळी धोक्यात

– तुषार रंधावे  करोना आणि लॉकडाऊनमुळे खरिपासाठी आवश्‍यक असलेल्या रासायनिक खतांच्या उत्पादक कंपन्यांचा कच्चा माल बंदरांमध्ये अडकून राहिल्याने, या कंपन्यांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झालेले नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कृषी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेत, कृषी विभागाने शेतीविषयक कामांना परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, मनुष्यबळाची कमतरता आणि वाहतूक समस्या लक्षात घेता, यंदाचा खरीप हंगाम … Read more

लॉकडाऊनमध्येही शेतीच्या कामांना वेग

पवनानगर – लॉकडाऊनच्या काळात मावळ तालुक्‍याच्या ग्रामीण भागात भात पेरणीपूर्व मशागतीच्या कामे जोरात सुरू आहेत. मावळात भात हे मुख्य पीक आहे. पेरणीसाठी आता राब भाजायला सुरुवात झाली आहे. तसेच भाताबरोबर आता मावळात ऊस पीकदेखील घेण्यात येत आहे. उसाची पिकांतर्गत बांधणी, मशात सध्या सुरू आहे. लॉकडाऊन असले तरी, शेतीच्या कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. भातलागवडीपूर्वी … Read more

शेतमाल गडगडला; शेतकरी हवालदिल

उत्पादन खर्च मिळत नसल्याने पिके अर्ध्यावर सोडली पवनानगर – राज्यभर जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठे तुडूंब आहेत. आता सहज उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे यंदा बागायती क्षेत्र चांगलेच फुलले. त्यामुळे फळभाजी पिकांसह पालेभाज्यांवर शेतकरी भर देत आहेत. वाढत्या बागायती क्षेत्रामुळे बाजारात आवक वाढली आणि पर्यायाने बाजारभाव कोसळला. भरघोस उत्पन्न मिळाले खरे, मात्र बाजारभाव गडगडल्यामुळे शेतमाल अर्ध्यावर सोडून देण्याची … Read more