महत्वाची बातमी ! मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार ‘रजा’ ; या राज्याच्या विद्यापीठाचा निर्णय

Periods Leave ।

Periods Leave । मासिक पाळीदरम्यान बहुतांश मुलींना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. मात्र या काळात मुलींना आराम मिळावा यासाठी पंजाबमधील एका विद्यापीठाने मोठा निर्णय घेतलाय. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यापीठाने हा नवा नियम लागू केलाय. पंजाब … Read more

पाच महिला पोलिसांना करायचेय लिंगपरिवर्तन; डीजी कार्यालयात दिले अर्ज

गोरखपूर  – उत्तर प्रदेश पोलिसांच्या पाच महिला कॉन्स्टेबलनी पोलिस उपमहासंचालकांच्या कार्यालयात लिंग बदलाची परवानगी मागणारा अर्ज दिला आहे. यामध्ये गोरखपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचेही नाव आहे. पोलिस विभागात पहिल्यांदाच असा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकारीही चिंतेत आहेत. ते आता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने हा घटनात्मक अधिकार घोषित केल्याने … Read more

कंगना विधानामुळे उडाली खळबळ,”महिला पुरुषांसाठी वॉशिंग मशीन आहेत का ?…”

बॉलीवूड क्वीन कंगना राणावत ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या विधानामुळे चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत असते. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेक वादांमुळे कंगनाला ट्रोलही व्हावे लागले आहे. अशात आता तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिलांबद्दल बोलताना दिसत आहे. कंगनाने महिलांची तुलना वॉशिंग मशीनशी केली आहे. … Read more

महिलेला पाच लाखांचा ऑनलाइन गंडा

सातारा – गुुगलपेद्वारे झालेल्या चुकीच्या व्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीची माहिती ऑनलाइन पहात असतानाच, सायबर गुन्हेगाराने बॅंकेतून बोलत असल्याचे फोन कॉलवरून सांगून कल्याणी वसंत माने (वय 55, रा. कामाठीपुरा, सातारा) यांना पाच लाख 44 हजार 429 रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी कल्याणी माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कल्याणी … Read more

महिला बहुविध प्रतिभासंपन्न; आगामी युग महिलांचे असेल : राज्यपाल कोश्यारी

मुंबई : महिलांना निसर्गतः बहुविध प्रतिभा लाभली आहे. आजवर देशात आणि जगात पुरुषांचे वर्चस्व असले तरीही आता मातृशक्तीचा जागर होत असून जगात तसेच भारतात नव्या युगाचा उदय होत आहे. हे आगामी युग महिलांचे असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई … Read more

ओलाच्या स्कुटर कारखान्यात सर्व महिला कामगार असणार

नवी दिल्ली – ओलाच्या स्कूटर कारखान्यामध्ये तब्बल दहा हजार महिला कामगार काम करतील. पूर्णपणे महिलांनी चालवलेली ही जगातील सर्वात मोठी फॅक्‍टरी असेल. ओला कंपनीचे सहसंस्थापक भावेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आत्मनिर्भर महिला होणे गरजेचे आहे. यासाठी महिलाकामगारांची पहिली तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. या महिलांना आवश्‍यक ते कौशल्य … Read more

तालिबान्यांचा खरा चेहरा जगासमोर! काबुल एअरपोर्टवर मुलींचा जबरदस्तीने ‘निकाह’; जीव वाचवण्यासाठी मुली म्हणतायत ‘कबुल है’!

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र सुरुवातीला जगाच्या रीतीप्रमाणे चालणार असल्याचे सांगणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. कारण तालिबानच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अनेक तरुणींना काबुल विमानतळाबाहेर जबरदस्तीने लग्न करायला लागल्याची बाब एका रिपोर्टमधून समोर आली आहे. एकट्या तरुणीला विमानतळावर जाण्यास मनाई तालिबानी कायद्यानुसार एकट्या तरुणींना … Read more

महिलांनो, घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे!

– श्रुती कुलकर्णी व्यायामाबद्दल बायकांच्या कल्पना भन्नाट असतात. बऱ्याच जणींच्या मते जिमला जाणे किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्‍यक नसते. त्यापेक्षा घरकाम, झाडू पोछा करून पोट कमी होते असा समज असतो. शिवाय जिमची फी आणि मोलकरणीचा पगारही वाचतो. डबल बचत! पोट कमी होणं म्हणजे फिटनेसची कमाल मर्यादा असाही अनेकींचा गैरसमज असतो. जसं काही पोट म्हणजे … Read more

पिंपरी : ‘ती’ लाचखोर महिला पोलीस कर्मचारी अखेर निलंबित

पिंपरी (प्रतिनिधी)  – वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून “त्या’ महिला वाहतूक पोलिसाचा ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.  दै. ‘प्रभात’ ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम व्हिडीओ क्लिपसह प्रसारित केले होते. … Read more

जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डाॅक्टरचा विनयभंग

पुणे (प्रतिनिधी) :  शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डाॅक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डाॅक्टारांनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय महिला डाॅक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.