अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला ; शिरूरच्या मैदानात कोल्हे- आढळराव यांच्यात अटीतटीची लढाई

मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे – शिरूर लोकसभेच्या मैदानात शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शड्डू ठोकले आहेत. हे कसलेले मल्ल आता आमने सामने उभे ठाकल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांची घरवापसी करीत चौकोनी परीघ पूर्ण केला आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी … Read more

पुणे जिल्हा : खेळाडूंची खिलाडूवृत्ती मैदानाबाहेर दिसते – गिल

लोणीत “पेरा’ प्रीमिअरचे उद्‌घाटन लोणी काळभोर – खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारी गोष्ट असून त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाला आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते, असे मत पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज … Read more

Rohit Pawar : राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी रोहित पवार मैदानात ; राज्यभरात ‘युवा संघर्ष यात्रा’ काढणार

Rohit Pawar : राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मैदानात उतरणार आहेत.  स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही काम नसणारे विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी, बेरोजगार तरुण या सर्व समस्यांसाठी ‘युवा संघर्ष यात्रा’  काढणार असल्याची माहिती खुद्द रोहित पवार यांनी दिली आहे राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या यात्रेविषयी माहिती … Read more

भोयरे गांगर्डा परिसरात पाणवठे कोरडे; वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती

पारनेर – उन्हाळ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढला असून वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ससेहोलपट पाहता वनविभागाने पाणवठ्यात पाणी सोडावे, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. पळवे रस्त्यालगत वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र कायमस्वरूपी हे पाणवठे कोरडे रहात असल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. भोयरे गांगर्डा … Read more

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे – दिलीप वळसे-पाटील

  हडपसर, – आजकालच्या जीवनात शिक्षण घेत असताना पूर्वी शालेय पाटी व वहिला जे महत्त्व होते ,ते आता राहिले नसेल.आज जीवनात जगातील सर्व ज्ञान जे कदाचित शाळेच्या वर्गात सर्व मिळू शकत नाही. जे संगणक व गुगल च्या माध्यमातून क्षणात मिळत आहे.आता आपल्याला किती टक्के गुण मिळाले याला फारसे महत्व राहिले नाही. परंतु, विद्यार्थी आपल्या आयुष्यात … Read more

मैदान, क्रिकेटर, अंपायर सगळे नकली ! गुजरातमधील बनावट आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा पर्दाफाश

सुरत – गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बनावट आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुळ आयपीएल स्पर्धेतील संघांचीच नावे कायम ठेवत युट्युबवरुन या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते, अखेर पोलिसांनी ही स्पर्धा बंद पाडत आयोजक तसेच काही सट्टेबाजांनाही अटक केली आहे. बनावट क्रिकेट लीग, नकली मैदान व नकली नावांचे क्रिकेटपटू व … Read more

BPL 2022 : क्रिकेटपटूचे मैदानावरच धुम्रपान

ढाका – अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत असून त्याच्या एका गैरवर्तनाने सध्या तो टीकेचा धनी बनला आहे. या स्पर्धेतील का सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. यावेळी अफगाणिस्तानचा अहमद शेहजाद अन्य खेळाडूंसह रेनब्रेकमध्ये मैदानात पाहणी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने चक्‍क धुम्रपान केले. या घटनेमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली … Read more

सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात उतरणार

मुंबई  – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागही पुर्वाश्रमीची भारतीय संघाच्या सलामीवीरांची जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. वल्ड रोड सेफ्टी स्पर्धेत भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असून याच सामन्यात सचिन आणि सेहवाग पुन्हा एकदा भारताच्या डावाची सुरुवात करणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा मोसम लवकरच सुरू होत … Read more

#INDvNZ | मुंबईतून प्रेक्षकांचा गजर; करोनानंतर प्रथमच चाहत्यांना मैदानात प्रवेश

मुंबई – मायदेशात होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी चाहत्यांना बीसीसीआय व मुंबई क्रिकेट संघटनेने आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यासाठी मैदानाच्या शंभर टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. हा दुसरा कसोटी सामना असून त्यापूर्वी पहिला कसोटी सामना कानपूरला होणार आहे. आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यावर न्यूझीलंड संघाचे … Read more

#T20WorldCup #PAKvAUS #SemiFinal 2 | ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला…..

दुबई – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. ( Pakistan face Australia in the second semi-final in Dubai ) या सामन्यातील विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र, तरीही फलंदाजी व गोलंदाजीतील बलाबल पाहता ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड राहणार आहे. पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलिया या … Read more