Inflation in India: आगामी महिन्यांत महागाई आणखी कमी होईल, अर्थ मंत्रालयाचा विश्वास

Inflation in India: येत्या काही महिन्यांत किरकोळ महागाई कमी होईल, असा अर्थ मंत्रालयाला विश्वास आहे. अधिक रब्बी पेरणी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील वाढ आगामी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक क्रियाकलाप मजबूत करेल. यावेळी एल निनो कमकुवत झाल्यामुळे चांगला मान्सून अपेक्षित आहे. चांगल्या खरीप पिकामुळे, ग्रामीण भारतातून मागणी मजबूत राहील ज्यामुळे आगामी आर्थिक वर्षात आर्थिक मजबूती … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 4 टक्के महागाई भत्त्याला अर्थ मंत्रालयाची मिळाली मंजुरी

Dearness Allowance – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर डीएची (Dearness Allowance) फाईल आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पोहोचली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या फाईलला आता केव्हाही मंजुरी मिळू शकते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचारी … Read more

GST collection : जीएसटी संकलनात जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र अव्वल; अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर..

नवी दिल्ली :- माहे जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलन 1,65,105 कोटी रुपये झाले असून, राज्यात 26 हजार 64 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलनाबाबत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, … Read more

किरकोळ, घाऊक महागाई नियंत्रणात – RBI

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने आणि अर्थ मंत्रालयाने केलेल्या आक्रमक उपाययोजनामुळे आता किरकोळ आणि घाऊक महागाई नियंत्रणात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर केवळ 6.77% मोजला गेला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 7.41% इतका होता. त्या अगोदर या महागाईचा दर त्यापेक्षा जास्त होता. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने प्रयत्न सुरू केले होते. आता … Read more

सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 26 टक्‍क्‍यांनी वाढून 1.47 लाख कोटींवर पोहोचले – वित्त मंत्रालय

नवी दिल्ली – सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 26 टक्‍क्‍यांनी वाढून 1.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे वित्त मंत्रालयाने शनिवारी सांगितले. गेले सलग सात महिने जीएसटी कलेक्‍शन 1 लाख 40 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,47,686 कोटी रुपये इतका झाला. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी 25,271 कोटी रुपये, राज्य जीएसटी 31,813 कोटी … Read more

जीएसटी संकलनात ‘इतक्या’ टक्‍क्‍यांनी वाढ; अर्थ मंत्रालयाकडून ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी जारी

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यातील वाढीव जीएसटी संकलनाची आकडेवारी अर्थ मंत्रालयाकडून आज जारी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यामध्ये जीएसटी संकलन 28 टक्‍क्‍यांनी वाढून 1.43 लाख कोटी रुपये झाले आहे. उत्सवात ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जीएसटी संकलन आहे त्या प्रमाणात वाढणार आहे. केंद्र सरकारने काही वस्तूवर जीएसटी वाढविला आहे. त्याचबरोबर ग्राहकाकडून मागणी वाढली … Read more

यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा

नवी दिल्ली – यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून देशात लाखो नागरिक रोज छोटे-मोठे डिजिटल व्यवहार करीत आहेत. या व्यवहारावर शुल्क लावण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अर्थ मंत्रालयाने अशा प्रकारचे कसलेही शुल्क यूपीआय व्यवहारावर लागणार नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने यूपीआय व्यवहारातील काही व्यवहारावर रकमांच्या मर्यादा ध्यानात घेऊन शुल्क आकारण्याच्या … Read more

ई-कॉमर्स धोरणाविरोधात देशातील बडे व्यापारी आक्रमक

नवी दिल्ली: देशातील प्रमुख व्यावसायिक नेते भारत सरकारच्या ई-कॉमर्स धोरणाचा उघडपणे निषेध करत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAT) नेतृत्वाखाली आज देशातील सर्व राज्यांतील 33 प्रमुख व्यावसायिक नेत्यांनी एक संयुक्त निवेदन दिले. या संयुक्त निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोणतेही सरकारी धोरण नसल्यामुळे आणि एफडीआय नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे नियमांकडे अत्यंत उदासीनतेने दुर्लक्ष केले जात … Read more

सरकारी इन्शुरन्स कंपन्यांच्या खासगीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांना शाखांच्या अनावश्यक खर्चात कपात करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चार सामान्य विमा कंपन्यांपैकी नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे या विमा कंपन्यांच्या खासगीकरणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. नीती आयोगाने विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांच्या … Read more

परिस्थिती वेगाने पुर्वपदावर येतेय; खर्चावरील निर्बंध अर्थमंत्रालयाकडून शिथील

नवी दिल्ल – केंद्रीय अर्थ मंत्रालयाने विविध विभागाच्या खर्चावर जून महिन्यामध्ये निर्बंध आणले होते. आता परिस्थिती वेगाने सुधारत असल्यामुळे हे निर्बंध दूर करण्यात आले असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मार्च महिन्यामध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून अर्थ मंत्रालय आणि विविध विभागांना ठरविलेल्या चौकटीतच खर्च करण्याची सूचना केली होती. मात्र आता परिस्थिती … Read more