neeraj chopra : फिनलॅंडमधील स्पर्धेतूनही नीरजची माघार

नवी दिल्ली  -टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आगामी पावो नुरमी या अत्यंत मानाच्या समजल्या जात असलेल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. डायमंड लीग स्पर्धेत त्याने विक्रमी कामगिरी केल्यावर त्याने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवले होते. त्यावेळी पुढील वर्षी पॅरिसला होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 90 मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्यही त्याने ठेवले होते. मात्र, … Read more

Neeraj Chopra : निरजच्या फिनलॅंडमधील प्रशिक्षणाला मंजूरी

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्रा याच्या फिनलॅंडमधील सरावाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक समितीने मंजुरी दिली आहे. पुढील महिन्यापासून निरजला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागीही व्हायचे असून त्यासाठी अत्याधूनिक व अद्ययावत सुविधांसह सरावाची गरज आहे. फिनलॅंडमधील कुओर्त ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात तो सराव करणार असून हा सर्व खर्च केंद्रीय क्रीडा … Read more

Finland: पंतप्रधानांची दारू पिऊन पार्टी, ड्रग्जचे सेवन केल्याचाही आरोप, व्हिडीओ व्हायरल

हेल्सिंकी – फिनलॅंडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात त्या मद्यपान करुन आपल्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत असून विरोधकांनी यावरुन पंतप्रधानांवर आरोप करत, या पार्टीत त्यांनी मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधानांच्या ड्रग्ज चाचणीची मागणीही विरोधकांनी केली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत पंतप्रधान समा मरीन … Read more

स्वीडन, फिनलंडला नाटोचे सदस्यत्व द्यायला अमेरिकेची मान्यता

वॉशिंग्टन – फिनलंड आणि स्वीडनला नाटोचे सदस्यत्व देण्याला अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मान्यता दिली आहे. सिनेटमधील 95 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे दोन तृतीयांश बहुमताची आवश्‍यक मर्यादा सहज पार झाली. हा ठराव मंजूर होण्यासाठी केवळ 30 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्‍यकता होती. मात्र या ठरावाच्या विरोधात केवळ एका सदस्याने मतदान केले आहे. सिनेटचे बहुमतातील पक्षाचे नेते चक … Read more

94 वर्षांच्या आजीची कमाल; वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅंम्पियनशिप स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

नवी दिल्ली – फिनलॅंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्‍स स्पर्धेत भारताच्या 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी चक्क सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी ( Bhagwani Devi Dagar ) या स्पर्धेतील 100 मीटर स्प्रिंट प्रकारात हे यश प्राप्त केल्यानंतर जागतिक क्रीडा क्षेत्रानेही आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 94-year-old Bhagwani Devi Dagar won a gold and 2 bronze … Read more

स्वीडन, फिनलंडच्या प्रवेशाला नाटोची संमती

ब्रुसेल्स – स्वीडन आणि फिनलंड या देशांच्या “नाटो’मधील प्रवेशाला “नाटो’तील सदस्य असलेल्या 30 देशांनी सहमती दिली आहे. या सर्व देशांचे संमती पत्र “नाटो’कडे पाठवण्यात आले आहे. आता “नाटो’च्या मुख्यालयातून या दोन्ही देशांच्या सहभागाला औपचारिक मान्यता दिली जाणे बाकी आहे. “नाटो’ने गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदे दरम्यान फिनलंड आणि स्वीडनला सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रण दिले होते. आता … Read more

नाटो सदस्यत्व: फिनलंड, स्वीडनबाबत तुर्कीचा आक्षेप दूर केला जाईल, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा विश्वास

वॉशिंग्टन- फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे सदस्यत्व देण्याबाबत तुर्कीला असलेला आक्षेप लवकरच दूर केला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या “नाटो’ देशांच्या परिषदेपूर्वीच हा आक्षेप दूर केला जाईल, असेही ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हविस्ता यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकेन … Read more

फिनलंड आणि स्वीडनच्या “नाटो’ प्रवेशाला इटलीचा पाठिंबा

रोम – फिनलंड आणि स्वीडन या देशांच्या नाटोतील प्रवेशाला इटलीने पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांनी नाटोमध्ये लवकरात लवकर सामील होण्यासाठी अंतर्गत प्रक्रियेला गती देण्यास ते तयार आहेत, असे इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी म्हणाले. नाटोच्या सदस्यत्वाची जलद मान्यता ही या टप्प्यावर फिनलंड आणि स्वीडनसाठी सर्वोत्तम सुरक्षा हमी असेल, असे द्राघी यांनी रोममध्ये पत्रकारांना सांगितले. आदल्याच दिवशी, … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे स्वीडन आणि फिनलंड चिंतेत; “नाटो’चे सदस्यत्व घेण्याच्या तयारीत

स्टॉकहोम – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्वीडन आणि फिनलंड चिंतेत आहेत. दरम्यान, स्वीडनचे परराष्ट्र मंत्री अॅन लिंडे यांनी शुक्रवारी सांगितले की, नाटोचे सदस्यत्व राष्ट्रीय सुरक्षेला चालना देईल आणि नॉर्डिक आणि बाल्टिक प्रदेशांना स्थिर करण्यास मदत करेल. फिनलंडने NATO मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या एका दिवसानंतर परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे. रशियाने युक्रेनवर … Read more

स्वीडन, फिनलंड देखील नाटोमध्ये सहभागी व्हावे

ब्रुसेल्स – फिनलंड आणि स्वीडन हे देश देखील नाटोमध्ये सहभागी होऊ शकतील, असे नाटोचे सरचिटणीस जीन स्टॉलेनबर्ग यांनी म्हटले आहे. जर या देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार केला, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. हे त्वरित देश नाटोचे सदस्य बनू शकतात, असे ते म्हणाले. रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभुमीवर फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे … Read more