Pune: शहरात कडक कायदा, सुव्यवस्था राखावी – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे – शहरातील अनेक अवैध गोष्टींकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सर्वत्र कडक कारवाई करून कायदा, सुव्यवस्था राखावी, अशी मागणी खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असता, ब्लॅक पबच्या … Read more

आरक्षणाबाबतचा अमित शाह यांचा फेक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांत तक्रार दाखल

Amit Shah Fake Video|

Amit Shah Fake Video|  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र त्यांचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजप नेत्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये गृहमंत्र्यांना एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केल्याचे म्हंटल आहे. भाजपने या … Read more

झारखंड: माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्या FIRनंतर रांची पोलिसांची ED अधिकाऱ्यांना नोटीस

रांची (झारखंड)  – माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे रांची पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे, आणि त्यांना मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात तपास यंत्रणेपुढे हजर राहण्यास सांगितले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर अनुसुचित जाती जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ही तक्रार दाखल केली होती. (Jharkhand: Ranchi police issues notice to ED officials after former … Read more

रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; फोन टॅपिंग प्रकरणी दोन्ही गुन्हे उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : आयपीएस रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन एफआयआर  नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे. … Read more

सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे.  उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत प्रियांक खरगे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने देशभरात गदारोळ माजला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्म संपवण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता … Read more

Jharkhand : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडींच्या विरोधात गुन्हा दाखल

रांची :- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्याविरुद्ध रांची येथील कानके पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरांडी यांनी एका फेसबुक पोस्ट मध्ये हेमंत सोरेन आणि शिबु सोरेन यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून झारखंड मुक्ती मोर्चाच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे … Read more

प्रदर्शनापूर्वीच ‘जवान’ सिनेमाच्या काही क्लिप चोरीला, FIR दाखल; नेमकं प्रकरण काय? वाचा….

मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने मोठी कमाई केली. पठाणच्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु … Read more

Pune Crime: लॅम्बोर्गिनी सुपर कारच्या धडकेत श्‍वानाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

पुणे – सुपर कारच्या धडकेत एका 8 वर्षांच्या भटक्‍या श्‍वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निना नरेश राय (57 , रा. एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. कार चालकाविरोधात सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहने चालवण्यासह प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 ऑगस्ट रोजी … Read more

Karnataka : खर्गेंच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य; माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल

कलबुर्गी :- कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल येथील पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येथील अशोक नगर पोलीस ठाण्यात कॉंग्रेस कार्यकर्ता राजीव जाने यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला. ज्ञानेंद्र यांच्यावर आयपीसीच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर बदनामीकारक … Read more

‘मेरे चारों तरफ बम लगा है’! पुणे विमानतळ बॉम्बने उडवण्याची महिलेची धमकी; 72 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुणे : ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे म्हणत पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका महिलेने दिल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्य म्हणजे ही धमकी एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेने दिली आहे. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा … Read more